हैदराबादWhatsApp :व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप्सपैकी एक आहे. एकट्या भारतात 500 दशलक्षाहून अधिक सक्रिय व्हॉट्सॲपचे वापरकर्ते आहेत. व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक, सोशल मीडियाच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपनं सगळीकडं लोकांचं जीवन खूप सोपं केलं आहे.
ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा : सण,उत्सवात व्हॉट्सॲपचा वापर अधिकच वाढतो. आता देशात दिवाळीचा सण जवळ येत आहे. आपल्यापैकी बहुतेकजण व्हॉट्सॲपच्या मदतीनं आपल्या मित्रांसह कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा पाठवता. पण, सगळ्यात मोठी समस्या उद्भवते, जेव्हा आपल्याला एकाच वेळी अनेकांना मेसेज करावा लागतो. मात्र, व्हॉट्सॲपवर फक्त पाचच जणांना मॅसेज एका वेळी पाठवता योतो. आपल्यापैकी बहुतेकजण याचं पद्धतीचा वापर करतात. मात्र, आज तुम्ही ही बातमी वाचल्यानंतर एकाच वेळी अनेकांना संदेश पाठवू शकता. तुम्हाला एकाच वेळी अनेक लोकांना मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्ही व्हॉट्सॲपवर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकता. ती लिस्ट कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगतो.
- पायरी 1 : तुमच्या मोबाइलवर व्हॉट्स ॲप उघडा आणि सेटिंग्जवर जा.
- पायरी 2 : 'ब्रॉडकास्ट लिस्ट' पर्याय निवडा आणि तुम्हाला ज्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत, त्यांची एक नवीन यादी तयार करा.
- पायरी 3 : संपर्क जोडण्यासाठी टिक मार्कवर क्लिक करत रहा.
- पायरी 4 : एकदा तुम्ही ब्रॉडकास्ट सूची तयार केल्यावर, तुम्ही ब्रॉडकास्ट सूचीमध्ये जोडलेल्या सर्व मित्रांसह नातेवाईकांना संदेश किंवा शुभेच्छा पाठवू शकता.