हैदराबाद Google Pixel 9 Pro pre orders start :Google नं Pixel 9 मालिकेतील नवीन Pixel 9 Pro स्मार्टफोनची भारतात प्री ऑर्डर सुरू झालीय. यापूर्वी, कंपनीनं या लाइनअपमध्ये Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL स्मार्टफोन सादर केले होते. नवीन Pixel 9 Pro फोनची किंमत काय आहे? त्यात कोणते फीचर्स आहे?, जाणून घेऊया...
Google Pixel 9 Pro किंमत : Pixel 9 Pro पोर्सिलीन, रोझ क्वार्ट्ज, हेझ आणि ऑब्सिडियन सारख्या कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसंच, 16GB + 256GB मॉडेलसाठी या फोनची किंमत 1 लाख 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. देशभरातील 15 शहरांमधील 150 हून अधिक क्रोमा, रिलायन्स रिटेल आऊटलेट्समधूनही ग्राहक फोनची बुकिंग करू शकता.
फोनवर 10 रुपयांची सूट : कंपनी ICICI बँक क्रेडिट, डेबिट कार्डधारकांना या फोनवर 10 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, तुम्ही हा फोन 12 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI वर खरेदी करू शकता. एवढंच नाही, तर कंपनी या फोनसोबत फक्त 7 हजार 999 रुपयांमध्ये Pixel Buds Pro ऑफर करत आहे.
Google Pixel 9 Pro फिचर : फोनमध्ये 6.3-इंच (1280 x 2856 पिक्सेल) 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले असून 1-120 Hz रिफ्रेश रेट आहे. तसंच फोनचा 3000 nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह सुसज्ज आहे. Google Pixel 9 Pro हे Google Tensor G4 प्रोसेसर, Titan M2 सुरक्षा चिप, 16GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतोय.