महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

फेक कॉल, क्रेडिट कार्डसह आधार कार्डच्या नियमात एक सप्टेंबरपासून मोठे बदल; खिशाला कात्री लागणार - New Rules From 1 September 2024 - NEW RULES FROM 1 SEPTEMBER 2024

LPG Aadhaar Card Rule Change : सप्टेंबर महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत असे अनेक बदल (New Rules From 1 September 2024) होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. तसंच, महागाई भत्त्याबाबत सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याची शक्यता आहे.

LPG, Aadhaar Card Rule Change
आधार कार्ड, एलपीजी सिलिंडरच्या नियमात बदल (ETV Bharat Maharashtra Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 28, 2024, 5:34 PM IST

Updated : Aug 28, 2024, 7:07 PM IST

नवी दिल्ली LPG Aadhaar Card Rule Change : येत्या सप्टेंबर महिन्यापासून अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. या बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत (New Rules From 1 September 2024) सर्व गोष्टींचा समावेश आहे. तसंच, महागाई भत्त्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा होऊ शकते.

सिलिंडर किंमतीत बदल : एलपीजी सिलिंडरची किंमत अनेकदा दर महिन्याच्या 1 तारखेला बदलते. व्यावसायिक गॅस सिलिंडर तसंच एलपीजीच्या किमतींमध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती. सप्टेंबर महिन्यातही सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

सीएनजी-पीएनजीच्या किंमतीत बदल : एलपीजी सिलिंडरच्या किंमतींबरोबरच, तेल बाजारातील कंपन्या हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) तसंच सीएनजी-पीएनजीच्या किमतीही सुधारणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सप्टेंबरच्या पहिल्या तारेखापासूनच त्यांच्या किंमतींमध्ये बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

फेक कॉल्सवर बंदी :1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स तसंच मेसेजवर बंदी घातली जाऊ शकते. ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना बनावट कॉल्स आणि बनावट मेसेजला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ट्रायनं कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. TRAI नं Jio, Airtel, Vodafone- Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्सला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत.

रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित : 1 सप्टेंबरपासून, HDFC बँक युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करणार आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2 हजार पॉइंट्स मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतीही सुट देणार नाही. IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करेल. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाईल. याशिवाय, एक बदल आहे - 1 सप्टेंबर, 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ : केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करेल, अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे. यात 3 टक्क्यांनं वाढ झाल्यानंतर तो 53 टक्के होईल.

मोफत आधार कार्ड अपडेट : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. तथापि, यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती. ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली.

नोट - प्राप्त माहितीनुसार, निर्णय झाल्याचा दावा 'ईटीव्ही भारत' करत नाही.

हे वाचलंत का :

  1. घरबसल्या असं करा आधार कार्ड अपडेट : ...अन्यथा 'या' तारखेनंतर मोजावे लागतील पैसे - Aadhaar Card Update
Last Updated : Aug 28, 2024, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details