हैदराबादSave Money on Train Tickets :सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात स्वस्त साधन आहे. देशातील करोडो लोकांना रेल्वेचा प्रवास आवडतो. त्यामुळं देशभरातील लाखो लोक दररोज तिचा वापर करतात. सणाच्या हंगामात लोक सुट्ट्यांवर जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यासाठी त्यांना आगाऊ तिकीट बुक करावं लागतं. त्यामुळं तुम्ही कोणत्या श्रेणीच्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहात त्यानुसार, तुमच्या तिकिटाची किंमत निश्चित केली जाते. ती कमी-अधिक असू शकते. सवलती, कूपनचा वापर करून तिकीट बुक केल्यास काही पैसे वाचू शकतात. त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
1. आगाऊ तिकिट बुक करा :जर तुमचा प्रवास आधीच ठरलेला असेल, तर तुम्ही आगाऊ तिकीट बुक करा. प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटच्या क्षणी बुकिंग केल्यास तिकीट मिळेलच याची श्वासवती नसते. शेवटच्या क्षणी बुकिंग केल्यानं कन्फर्म तिकीट मिळण्याची अनिश्चितता वाढते. तुम्ही 'तत्काळ बुकिंग' देखील टाळावं, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागेल.
2. तुमचं बुकिंग विभाजित करा :जर अनेक लोक एकत्र प्रवास करत असतील, तर तिकिटांचं विभाजन करायला हवं. तुम्ही लांबच्या प्रवासासाठी एकच तिकीट बुक करू शकता किंवा प्रवासाची विभागणी करून अनेक तिकीट बुक करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रायपूर ते पाटणा प्रवास करायचा असेल तर, तुम्ही तुमचा प्रवास दोन टप्प्यात विभागू शकता. ही युक्ती विशेषतः सणासुदीच्या काळात उपयोगी पडते.
3. कॅशबॅक ऑफरवर लक्ष ठेवा : तुमची तिकिटं बुक करताना तुम्ही नेहमी कॅशबॅक ऑफरवर लक्ष ठेवावं. शेवटच्या क्षणी बुकिंगवर भरपूर पैसे खर्च करण्याऐवजी आगोदरच बुकिंग करावं. अनेक वेबसाइट्स रेल्वे तिकीट बुकिंगवर कॅशबॅक, तसंच सूट देतात.