महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टीव्हीएसच्या विक्रीत वाढ - AUTO SALES NOVEMBER 2024

ऑटो कंपन्यांनी नोव्हेंबरमधील ऑटो विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यात Maruti Suzuki, Toyota Kirloskar Motor, Tata Motors, TVS Motor चा समावेश आहे.

Tata Motors
टाटा मोटर्स (Tata Motors)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 2, 2024, 12:01 PM IST

Updated : Dec 2, 2024, 12:33 PM IST

हैदराबाद Auto sales November 2024 : ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी आज 1 डिसेंबर रोजी गेल्या महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले. नोव्हेंबरमध्ये देशातील सर्वात मोठी कार कंपनी उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं 1.81 लाख वाहनांची विक्री केली. दुसरीकडं, टाटा मोटर्सच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये वार्षिक 0.8 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. याशिवाय, JSW MG Motor, Escorts Kubota आणि Toyota India सारख्या सर्व मोठ्या कंपन्यांच्या विक्रीचे आकडे देखील समोर आले आहेत.

Maruti Suzuki : मारुती सुझुकीनं नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण 1.81 लाख वाहनांची विक्री केलीय. ही विक्री 1.77 लाख युनिटपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, नोव्हेंबर 2023 मधील 1.64 लाख युनिट्सपेक्षा ते 10.4 टक्के अधिक आहे. मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री वार्षिक 8.1 टक्क्यानं वाढून 1.53 लाख युनिट्सवर पोहचलीय. प्रवासी वाहनांची विक्री 5.3% वरून 1.41 लाख युनिट्सपर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय मागणीमुळे कंपनीची निर्यात वर्षभरात 24.8 टक्क्यांनी वाढून 28 हजार 633 युनिट्स झालीय.

TVS Motor :TVS मोटरनं एकूण 4.01 लाख युनिट्सची विक्री नोंदवलीय, जी बाजारातील 3.87 लाख युनिट्सच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. नोव्हेंबर 2023 मधील 3.64 लाख युनिट्सवरून ही 10.2 टक्के वार्षिक वाढ आहे. दुचाकी वाहनांची विक्री वार्षिक 12 टक्क्यांनी वाढून 3.92 लाख युनिट झाली, तर कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 57 टक्क्यानं वाढून 26 हजार 292 युनिट्स झाली. ज्यामुळं ग्राहकांचा इलेक्ट्रिक मोबिलिटीकडं होणारा बदल दिसून येतो.

Toyota Kirloskar Motor: टोयोटा किर्लोस्कर मोटरनं नोव्हेंबर 2023 मध्ये 17 हजार 818 विक्री केली होती. आता कंपनीनं नोव्हेंबर 2024 मध्ये 25 हजार 586 युनिट्सपर्यंत वाढलीय, ही 44% वाढ आहे. टोयोटाच्या भारतीय पोर्टफोलिओचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या SUV च्या सातत्यानं वाढणाऱ्या मागणीचा कंपनीला फायदा झाला आहे.

MG Motor India:त्याचप्रमाणे, एमजी मोटर इंडियानं 6 हजार 19 युनिट्सची एकूण विक्री नोंदवली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% अधिक आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनानं महत्त्वाची भूमिका बजावली. एकट्या विंडसर इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरनं 3 हजार 144 युनिट्सची विक्री केली, जी भारतातील ईव्हीची वाढती लोकप्रियता दर्शवतेय.

ह्युंदाई मोटर इंडिया :Hyundai Motor India Limited (HMIL) ने नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण 61 हजार 252 वाहनांची विक्री केली. ज्यात 48 हजार 246 देशांतर्गत विक्री आणि 13 हजार 6 निर्यातीचा समावेश आहे. SUV नं देशांतर्गत विक्रीत वर्चस्व राखून एकूण विक्रीत 68.8 टक्के योगदान दिलंय. नाविन्यपूर्ण Hy-CNG Duo तंत्रज्ञानानं CNG वाहनांच्या विक्रीलाही चालना दिली, जी एकूण विक्रीच्या 14.4 टक्के आहे.

जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया : JSW MG मोटर इंडियानं घाऊक विक्रीत 20% वाढ नोंदवली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 मध्ये 6 हजार 19 युनिट्सपर्यंत पोहोचली. कंपनीच्या इलेक्ट्रिक क्रॉसओवर विंडसरनं 3 हजार 144 युनिट्सची विक्री नोंदवली. एकूण मासिक विक्रीत नवीन ऊर्जा वाहने (NEVs) चा वाटा 70 टक्के आहे.

एस्कॉर्ट्स कुबोटा :एस्कॉर्ट्स कुबोटाची विक्री नोव्हेंबर 2024 मध्ये घटलीय. एस्कॉर्ट्स कुबोटा विक्री वार्षिक 9.4%वरून घसरून एकूण 8,974 युनिट्सपर्यंत पोहचलीय. कंपनीनं देशांतर्गत 8 हजार 730 ट्रॅक्टरची विक्री केलीय, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.1% कमी आहे. कंपनीची निर्यातही 39.5% नं घसरून 244 युनिट्सवर आली आहे. सणासुदीच्या महिन्यांत (सप्टेंबर-नोव्हेंबर), एस्कॉर्ट्सच्या ट्रॅक्टर विक्रीत 9% वाढ होऊन 38 हजार 554 युनिट्स झाली होती.

टोयोटा इंडिया :टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडियानं विक्रीत 44% वाढ नोंदवली. जी गेल्या वर्षी 17 हजार 818 युनिट्स होती. नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीनं 25 हजार 586 युनिट्सपर्यंत मजल गाठलीय. ही वाढ प्रामुख्यानं कंपनीच्या SUV ला वाढलेल्या मागणीमुळं झाली.

टाटा मोटर्स :टाटा मोटर्सनं 74 हजार 753 युनिट्सच्या एकूण विक्रीसह स्थिर कामगिरी केली. नोव्हेंबर 2023 मधील 74 हजार 172 युनिट्सच्या तुलनेत कंपनीनं 2024 मध्ये 0.8 टक्क्यांनी किरकोळ वाढ केलीय. देशांतर्गत विक्री देखील केवळ 1% वाढून 73 हजार 246 युनिट्सवर पोहोचली. तथापि, व्यावसायिक वाहनात 1 टक्क्यांनी घट होऊन 26 हजार 183 युनिट्सची विक्री झालीय.

हे वाचंलत का :

  1. Tata Motors च्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये किंचित वाढ
  2. Honda Amaze, Toyota Camry, Kia Syros होणार डिसेंबरमध्ये लॉंच, काय आहेत फीचर?
  3. Skoda Kylaq SUV चं बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू, 189 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 44 लीटर बूट स्पेस
Last Updated : Dec 2, 2024, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details