महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर AK47 रायफलीतून प्राणघातक हल्ला, AK 47 रायफल म्हणजे मृत्यूचा काळ - Donald Trump Firing

Donald Trump Firing : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा AK47 रायफलीतून प्राणघातक हल्ला झालाय. यातून ते थोडक्यात बचावले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये 13 जुलै रोजी झालेल्या रॅलीनंतर रविवारी दुपारी एका गोल्फ क्लबमध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेच्या वेळी ट्रम्प गोल्फ खेळत होते. ज्या रायफलीतून त्यांच्यावर हल्ला झाला ती कोणी बनवली, तिचं वैशिष्ट्ये काय आहे? ते जाणून घेऊया..

Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प, AK47 (Getty)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 16, 2024, 2:57 PM IST

डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Firing :अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले असून सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोराला पकडलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, रायन वेस्ली राउथ असं हल्लेखोराचं नाव आहे. गोल्फ खेळत असताना रुथनं ट्रम्प यांच्यावर AK 47 रायफलीतून हल्ला केला. या आगोदर देखील पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील ते थोडक्यात बचावले होते. दुसऱ्या हत्येचा प्रयत्नात देखील डोनाल्ड ट्रम्प 'सुरक्षित' असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यावर ज्या AK 47 रायफलीतून हल्ला झाला त्या रायफलीबाबत तुम्हाला माहिती आहे का? चाला तर जाणून घेऊया...

AK-47 रायफलची वैशिष्ट्ये :AK-47 रायफलमध्ये एकावेळी 30 गोळ्या भरल्या जाऊ शकतात. या बंदुकीच्या बॅरलमधून बुलेट बाहेर पडण्याचा वेग 710 मीटर प्रति सेकंद आहे. ही बंदूक एका सेकंदात 6 गोळ्या झाडते, म्हणजे एका मिनिटात अंदाजे 600 राऊंड फायर करता येतात. यातून निघालेल्या गोळ्या भिंतीलाही छेदून जावू शकतात. AK47 स्वयंचलित आणि अर्ध स्वयंचलित मोडमध्ये काम करू शकते. AK-47 रायफल ही एकमेव रायफल आहे जी कोणत्याही वातावरणात काम करू शकते. इतकंच नाही तर जगात सर्वाधिक वापरलं जाणारं शस्त्र म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये AK-47 चं नाव समाविष्ट आहे. आज जगात सुमारे 100 दशलक्ष AK-47 आहेत. ही जगातील सर्वात बेकायदेशीरपणे विकली जाणारी रायफल आहे. रशियाशिवाय इतर 30 देशांकडं AK-47 तयार करण्याचा आणि पुरवण्याचा परवाना आहे. ज्यामध्ये चीन, भारत, इजिप्त, इस्रायल, नायजेरिया इ.

AK 47 रायफल जगभरात प्रसिद्ध :AK 47 रायफल, जगातील मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या रायफलीपैकी एक आहे. तिच्या निर्मितीनंतर ती लष्करी तसंच गुन्हेगांरामध्ये प्रसिद्ध झालीय. 1947 मध्ये सोव्हिएत अभियंता मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी डिझाइन केलेली AK 47 (Avtomat Kalashnikova 1947) तिच्या गुणवैशिष्ट्यामुळं जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक दशकांपासून जगभरातील संघर्षांमध्ये तिचा वापर होतोय. आजही याच AK 47 रायफलीतून : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी :AK 47 रायफर द्वितीय विश्वयुद्धानंतर विकसित करण्यात आली होती. सोव्हिएत-अफगाण युद्धापासून ते सीरियन गृहयुद्धापर्यंत जागतिक संघर्षांना आकार देण्यात AK 47 नं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याची व्यापक उपलब्धता, वापरातील सुलभतेमुळं ति अनेकांच्या पसंतीचं शस्त्र बनलंय. कलाश्निकोव्हची रायफर अत्यंत प्रतिकूल हवामानात देखील काम करते. या क्षमतेमुळं रायफल लष्करी दलांमध्ये आवडती बनली.

जागतिक प्रसार आणि वापर : AK 47 हे 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनच्या सशस्त्र दलांसाठी प्रमाणित शस्त्र बनलं होतं. परंतु त्यानंतर चीन, पूर्व जर्मनी आणि रोमानियासह सोव्हिएत प्रभावक्षेत्रातील इतर देशांमध्ये AK 47 च्या उत्पादनासाठी परवाना देण्यात आला. त्यानंतरच्या दशकांमध्ये, इतर अनेक राष्ट्रांनी AK 47 च्या आवृत्त्या तयार करण्यास सुरुवात केली. रायफलच्या साधेपणामुळं अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना देखील ही रायफल वापरणं सोपं झालं. या रायफलीचा उत्पादन खर्च कमी असल्यानं तिला मोठ्या प्रमाणात तयार केलं जाऊ शकतं. त्यामुळंच AK 47 रायफल जगभरातील अनेक बंडखोर गटाच्या आवडीचं शस्त्र बनलं. आफ्रिका, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये, AK 47 रायफल प्रतिकार आणि क्रांती या दोन्हींचं प्रतीक आहे.

आधुनिक युद्धात AK 47 :70 वर्षांहून अधिक जुनी रायफल असूनही, AK 47 अजूनही जगभरातील सैन्य, निमलष्करी गट तसंच बंडखोर वापरात आहे. तिचा टिकाऊपणा आणि देखरेखीच्या सुलभतेमुळं तिचा वापर मोठ्या प्रमाणवर केला जातोय. AK 47 चे नवीन प्रकार कालांतरानं उदयास आले आहेत, ज्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

विवाद :AK 47 बंडखोरोरांनी केलेल्या वापरामुळं वादाचा विषय बनला आहे. काही प्रदेशांमध्ये हिंसक गुन्हेगारी करण्यासाठी बंडखोरांनी AK 47 चा वापर केल्याचं दिसून येतं. तिचा वादग्रस्त वारसा असूनही, AK47 चा युद्धावर झालेला प्रभाव निर्विवाद आहे. 20व्या आणि 21व्या शतकात देखील तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. मोझांबिक सारख्या राष्ट्रीय ध्वजांमध्ये देखील तिचा समावेश केला गेलाय. इतिहासातील सर्वाधिक उत्पादित होणारी रायफल म्हणून तिची ओळख आहे.

लवचिकता आणि क्रांतीचे प्रतीक असलेली AK 47 रायफल आधुनिक युद्धाचा एक मध्यवर्ती भाग आहे. तिचा जागतिक प्रसार, लष्करी रणनीती, बंडखोरी आणि संघर्ष क्षेत्रावरील तिचा चिरस्थायी प्रभाव इतिहासात नोंदवला गोलाय. मात्र, रायफलचं आधुनिक युद्धातील विनाशकारी वास्तव यातून समोर येत आहे.

हे वाचलंत का :

  1. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न; जगभरात खळबळ, राष्ट्राध्यक्ष जो बायडन संतापले - Donald Trump Assassination Attempt

ABOUT THE AUTHOR

...view details