महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

2025 बजाज पल्सर आरएस200 नवीन लूक आणि वैशिष्ट्यांसह लाँच, काय आहे किंमत? - 2025 BAJAJ PULSAR RS200 LAUNCH

बजाज ऑटोनं त्यांची 2025 बजाज पल्सर आरएस200 भारतीय बाजारात लाँच केलीय. जाणून घेऊया किंमत आणि वेशिष्ट्ये...

2025 Bajaj Pulsar RS200
2025 Bajaj Pulsar RS200 (Bajaj)

By ETV Bharat Tech Team

Published : 8 hours ago

हैदराबाद : गेल्या काही आठवड्यांपासून, स्वदेशी दुचाकी उत्पादक बजाज ऑटो एका नवीन बाईकचं टीझर रिलीज केला होता. पण, अखेर कंपनीनं त्यांची 2025 ची बजाज पल्सर आरएस200 लाँच केली आहे. कंपनीनं ही कार 1.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केली आहे. या मोटरसायकलची पहिली आवृत्ती 20215 मध्ये लाँच करण्यात आली होती, तेव्हापासून ही मोटरसायकलला व्यापक अपडेटसह लॉंच करण्यात आलीय. अपडेटसोबतच, मोटरसायकलमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल देखील करण्यात आले आहेत, तसंच ती अद्ययावत करण्यासाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत.

2025 बजाज पल्सर आरएस200 चं डिझाइन
मोटरसायकलच्या डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला नसला तरी, त्यात पूर्वीप्रमाणेच एजी स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, एलईडी प्रोजेक्टर लाईट्स आहेत. त्याच्या टँक आणि खालच्या काऊलची रचना देखील पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. मागील बाजूस, मोटरसायकलला एक नवीन आणि कमीत कमी एलईडी टेल लॅम्प सेटअप मिळतोय.

2025 बजाज पल्सर आरएस200 वैशिष्ट्ये आणि रंग पर्याय
2025 पल्सर आरएस200 तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ग्लॉसी रेसिंग रेड, पर्ल मेटॅलिक व्हाइट आणि अ‍ॅक्टिव्ह सॅटिन ब्लॅक रंगाचा समावेश आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, मोटरसायकलला आता टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्टसह एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतोय. हे तेच TFT युनिट आहे, जे पल्सर NS200 आणि N250 सारख्या मॉडेल्समध्ये वापरलं जातं.

2025 बजाज पल्सर आरएस200 चे हार्डवेअर
2025 पल्सर आरएस200 च्या मेकॅनिकल भागांबद्दल बोलायचं झाले तर, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सेटअप आणि मागील बाजूला मोनोशॉक सेटअप आहे. ब्रेकिंग सिस्टीम देखील कायम ठेवण्यात आली आहे आणि मोटरसायकलला 300 मिमी फ्रंट डिस्क आणि 230 मिमी रियर डिस्क मिळतोय. मोटरसायकलमध्ये तीन ABS मोडसह ड्युअल-चॅनेल ABS देखील आहे - रोड, रेन आणि ऑफ रोड. ही बाईकला 17-इंच चाक दिली आहेत. तसंच टायरची रुंदी देखील वाढली आहे.

2025 बजाज पल्सर आरएस200 पॉवरट्रेन
पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, मोटरसायकलमध्ये सिंगल-सिलेंडर 119.5 सीसी इंजिन आहे, जे 9750 आरपीएमवर 24 बीएचपी पॉवर आणि 8000 आरपीएमवर 18.7 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे, ज्याला आता असिस्ट आणि स्लिपर क्लचचा सपोर्ट मिळतो.

हे वाचलंत का :

  1. Oppo Reno 13 Pro 5G आणि Oppo Reno 13 5G भारतात लाँच, काय आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन?
  2. POCO X7 5G आणि POCO X7 Pro 5G भारतीय बाजारात लाँच, काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
  3. मॅकॅफीचा AI चालित डीपफेक डिटेक्टर भारतात लाँच, किंमत फक्त 499

ABOUT THE AUTHOR

...view details