ठाणे :बदलापूरमध्ये विद्यार्थिनी सोबत केलेल्या लैंगिक छळाचं प्रकरण उजेडात आल्यानंतर शाळेतील शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागलं. त्यानंतर आता मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत घडलेल्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. एका माथेफिरूनं वर्गात एकटी बसेल्या 5 व्या वर्गातील चिमुकलीसमोर अश्लील कृत्य केलं. मात्र पीडितेनं ही बाब पालकांना आणि वर्गातील प्राचार्य महिलेला सांगितली. मात्र प्राचार्य महिलेनं ही बाब लपवून ठेवली. शाळेची बदनामी होईल, त्यामुळे कोणाला काही सांगू नको, असा दम पीडितेला प्राचार्यानं दिला. मात्र पीडितेनं ही बाब पालकांना सांगितल्यानं पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणी प्रकरण लपवून ठेवणाऱ्या प्राचार्य महिलेवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्राचार्य महिलेनं पीडितेला धमकावून लपवलं पोक्सोचं प्रकरण :पालकांनी एका पाचव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीला वर्गात सोडल्यानंतर एका अज्ञात माथेफिरुनं चिमुकलीसमोर जाऊन अश्लील कृत्य केलं. ही घटना मंगळवारी सकाळी 7-00 ते 7-15 वाजण्याच्या सुमारास घडली. सादर घटना दडपून पीडित मुलीला कुणालाच सांगू नको असं धमकावणाऱ्या प्राचार्य महिलेला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अन्य आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माथेफिरुचं वर्गात चिमुकलीसमोर अश्लिल कृत्य :मंगळवारी 3 सकाळी 7 वाजता पीडित चिमुकलीला तिच्या वडिलांनी शाळेत सोडलं. ही पीडिता 5 वीच्या इयत्तेत आपल्या वर्गात बसली होती. लवकर गेल्यानं ती एकटीच वर्गात होती. हीच संधी साधित अज्ञात विकृत नराधमानं शाळेत प्रवेश केला. अन् मुलीच्या वर्गात दाखल झाला. त्यानं चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. त्यामुळे हादरलेल्या चिमुकलीनं घाबरून आरडाओरड केली. त्यामुळे नराधमानं पळ काढला. मात्र हा सगळा प्रकार शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर पीडित चिमुकलीनं सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. सोबतच सदरचा प्रकार हा पीडितेनं शाळेच्या प्राचार्य महिलेला सांगितला. मात्र प्राचार्यानं चिमुकलीला "सदरचा प्रकार कुणालाही सांगू नको," असं धमकावल्याचं सांगितल्यानंतर याबाबत पीडितेच्या पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार लिहून घेत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीच्या कृत्याला लपवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शाळेच्या प्राचार्य महिलेलाही गुन्ह्यात सह आरोपी करून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
- घर मालकाचा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम अटकेत
- १५ वर्षीय प्रेयसीवर १९ वर्षीय प्रियकराचा बळजबरीने बलात्कार; दगाबाज प्रियकराला अटक
- झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेलं अन् केला अत्याचार; पाच नराधम ताब्यात