महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्रालयात तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण; पोलिसांची माहिती - Devendra Fadnavis Office Attack

Devendra Fadnavis Office Attack मंत्रालयात घुसून सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणारी महिला ही मानसिक संतुलन बिघडलेली असल्याची माहिती तिच्या सोसायटीत राहणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Female mental patients
मंत्रालयात तोडफोड करणारी महिला (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 5:39 PM IST

Updated : Sep 27, 2024, 6:36 PM IST

मुंबई Devendra Fadnavis Office Attack-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणारी महिला ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती आता समोर आली असून, पोलीस अधिक तपास करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयात घुसून सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणारी महिला ही मानसिक संतुलन बिघडलेली असल्याची माहिती तिच्या सोसायटीत राहणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वीही या महिलेने अनेकदा असे प्रकार केले असून, ती मानसिक रुग्ण आहे, तिला उपचाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्ला करणारी महिला राडेबाज :धनश्री सहस्त्रबुद्धे असे या महिलेचे नाव असून, या महिलेने यापूर्वी सुद्धा तिच्या दादर येथील रामगिरी सोसायटीमध्ये अनेक वेळा राडा घातला आहे. तिने सोसायटीमधील अनेक कुटुंबीयांच्या घराच्या दारावर जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन तिने चाकूचा धाकसुद्धा दाखवला होता, अशी माहिती भाजपाच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी दिली आहे. त्यामुळे या महिलेला मानसिक उपचारांची गरज असून, तिला आपल्या सोसायटीत आता ठेवू नये अन्यथा इतर नागरिकांच्या जीवाला धोका आहे, असे अक्षता तेंडुलकर यांनी सांगितले.

माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

उच्चशिक्षित महिला अविवाहित : धनश्री सहस्रबुद्धे ही उच्चशिक्षित महिला असून, ती अविवाहित आहे. ती घरी एकटीच राहत असल्याने तिची मानसिक अवस्था बिघडली आहे. तिला सलमान खानसोबत लग्न करायचे आहे, असे ती म्हणत असते. त्यामुळे अशा महिलेपासून समाजाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित महिलेवर कारवाई होणार :दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिलेची ओळख पटली असून, तिच्याबद्दल अधिक माहिती हाती आली आहे. त्यामुळे ही महिला मंत्रालयात कशी घुसली आणि तिने का हल्ला केला? यासह तिच्या एकूण पार्श्वभूमीची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा

  1. काँग्रेसला मुंबई अन् विदर्भात हव्यात सर्वाधिक जागा; राज्यातील सत्ता स्थापनेसाठी विदर्भ ठरणार निर्णायक - Congress demands 45 seats Vidarbha
  2. प्रकाश आंबेडकर यांचा तिसऱ्या आघाडीत समावेश का झाला नाही? जाणून घ्या, राजकीय कारणे - Tisari Aghadi
Last Updated : Sep 27, 2024, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details