महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिम करताना कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी काय म्हटलं? - EXERCISE SAFETY TIPS - EXERCISE SAFETY TIPS

Exercise Safety हल्लीच्या दगदगीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं कठीण झालं आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देता यावं तरुणाई जिमकडे वळली आहे. परंतु व्यायाम कसं करावं याचं अनेकांना पुरेपूर ज्ञान नाही. परंतु अपूर्ण ज्ञानामुळे ते कधीही धोक्यात येऊ शकतात. यामुळे जिम करताना कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिलाय पाहूया.

Exercise Safety
जिम करताना काळजी घ्या (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 1:08 PM IST

Updated : Jul 24, 2024, 6:39 PM IST

मुंबईExercise Safety : उत्तम आरोग्यासाठी तरुण पिढी जिममध्ये किंवा घरी व्यायाम करतात. परंतु व्यायाम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा दुष्परिणामा होतात. तसेच हृदयविकाराच्या आजारात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथे जिममध्ये जिम करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येवून त्याचा मृत्यू झाला. यामुळे जिम करताना कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊ.

तज्ज्ञांनी काय म्हटलं? (ETV Bharat Reporter)

यांना बळी पडू नका:सध्या सिक्स पॅकची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. बलदंड शरीर कमवण्यासाठी अतिरिक्त व्यायाम केला जातो. पण हा अतिरिक्त व्यायाम कधीकधी आपल्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे सध्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. तसंच सिक्स पॅकच्या नादात आपला जीव गमावू नका. आपणाला आनुवंशिक काही आजार आहे का? याचीही तपासणी केली पाहिजे. जर एखाद्याच्या आई-वडिलांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर त्यानं व्यायाम करताना हृदयविकारतज्ञ यांच्याकडे जाऊन कोणत्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे, याचा सल्ला घ्यावा. त्यामुळे निश्चितपणं कुठलाही धोका होणार नाही, असं आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

डॉक्टराच्या सल्ला घ्या: आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते. परंतु हा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? कुठल्या प्रकारे करायचा? याला काही मर्यादा आहेत. जिम्नॅस्टिकमधील व्यायामानं आपल्या हृदयावर ताण पडतो. हृदयावर ताण पडल्यामुळे हृदय काम करत नाही. आपल्या शरीरात जेवढे रक्त आहे, तेवढं बाहेर फेकलं जात नाही. रक्तदाब कमी होऊन दम लागतो. त्यामुळे व्यक्तीचे हृदय बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करताना काळजी घेतली पाहिजे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानंच व्यायाम केला पाहिजे, असं आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे.


वय, आजार आणि शरीराचा विचार करा:आपण शरीरासाठी आणि निरोगी राहण्यासाठी निश्चितपणे व्यायाम केला पाहिजे. पण व्यायाम करताना आपले वय किती? आपणाला कोणते आजार आहेत? आपले शारीरिक रचना कशी आहे? याचा विचार करून व्यायाम करावा. यासाठी एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानंच वरील सर्व गोष्टीचा विचार करून व्यायाम करावा. डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांचाशी चर्चा करूनच व्यायाम केला तर कोणतेही अनुचित घटना घडणार नाही, असेही आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

  1. Heart Attack In Gym : जिममध्ये व्यायाम करताना आला हार्ट अटॅक..पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू!
  2. 'तो' रागानं बघतोय म्हणून जिम ट्रेनरचा पारा चढला, मुगदलने हल्ला करून युवकास केलं जखमी - Gym Trainer Attacked
  3. Gym Trainer Died : जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद
Last Updated : Jul 24, 2024, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details