कोल्हापूर Hasan Mushrif On Vishalgarh violence :विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर पाच दिवसांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी गजापुरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, नुकसानग्रस्तांना शासकीय मदत लवकर मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी मुश्रीफ यांनी सांगितलं.
3 कोटींचं नुकसान : आतापर्यत गजापुरात 3 कोटींच्या नुकसानीची प्राथमिक माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीन तास पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आग्रही असल्याचं मंत्री मुश्रीफ म्हणाले. तसंच विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं जाईल. माजी खासदार संभाजीराजे यांच्याशी प्रशासनाची चर्चा झाली होती. उच्च न्यायालयाची स्थगिती असल्यानं अतिक्रमण काढण्यात अडचण येत असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं होतं. संभाजीराजेंनी पावसाळा संपेपर्यंत थांबायला हवं होतं. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी माहिती संभाजीराजेंनी पोलीस प्रसानानाला दिली होती, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
गजापूर हिंसाचाराची सखोल चौकशी :पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये, असं उच्च न्यायालयाचं मत आहे. शासनानं स्थगिती नसलेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निर्दोष लोकांना आधार देणं सरकारचं प्राधाण्य आहे. त्यांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल, याचा विचार लोक करत आहेत. अनेक शिवभक्त याठिकाणी मोहिमेस येतात त्यांना अडवू शकत नाही, कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत, असं घडलं. पुन्हा असं घडणार नाही, याची काळजी घेऊया. या सर्व गोष्टींची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल.
राष्ट्रवादीकडून नुकसानग्रस्तांना मदत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नुकसानग्रस्त गजापूर गावाला भेट दिली. गावातील नुकसान झालेल्या घरांची प्रार्थना स्थळाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना रेनकोट, ब्लांकेट, वेटर आणि आर्थिक स्वरूपाची मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी आमदार राजेश पाटील, नविद मुश्रीफ, भैय्या माने यांची उपस्थिती होती.
'हे' वाचलंत का :
- विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती, सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश - Vishalgad Encroachment
- कोल्हापुरात सामाजिक समतेचं दर्शन, विशाळगड हिंसाचारानंतर काढण्यात आली शिव-शाहू सदभावना रॅली - Vishalgad Violence
- विशाळगड घटनेचा मास्टरमाईंड सरकारने शोधावा- विजय वडेट्टीवार - Vijay Wadettiwar