मुंबई Vice Global Tapas Bar Seal: मुंबईतील वरळीत 7 जुलै रोजी झालेल्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागानं जुहूतील व्हाइस ग्लोबल तापस बार सील केला आहे. आरोपी मिहीर येथे दारू पिण्यासाठी आला होता. दोन दिवसांच्या तपासणीनंतर या बारवर कारवाई करण्यात आली आहे. बार चालकानं नियमाचं उल्लंघन केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलीस तपासात समोर आले आहे : हा अपघात रविवारी सकाळी झाला होता. मुंबईतील वरळी परिसरात भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारनं कावेरी नाखवा यांना चिरडल्याची घटना घडली होती. याशिवाय त्यांचे पती प्रदीप नाखवा हे या अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी चालक बिदावत हा देखील बीएमडब्ल्यू कारमध्ये प्रवास करत होता. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केलं आहे. कार कावेरी नाखवा यांना 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल :या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 'सरकारला श्रीमंतांच्या पोरांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला चिरडायचं आहे. सरकारला आरोपींना संरक्षण द्यायचय. त्यामुळं हिट अँड रन प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रात असेच फिरत आहेत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे.
असं आहे प्रकरण :मिहिर शाहनं जुहू येथील बारमध्ये दारू प्यायल्याचं पोलिसांनी सांगितलंय. घरी जाताना त्यानं ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हवर नेण्यास सांगितलं होतं. गाडी वरळीला आल्यावर मिहीरनं गाडी चालवण्याचा हट्ट धरला. यानंतर काही वेळानं भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली. कावेरी नाखवा, तिचा पती प्रदीप नाखवा हे दोघे दुचाकीवरून जात होते. जे वरळीच्या कोळीवाडा भागातील रहिवासी आहेत.
हे वाचलंत का :
- वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
- वरळी हिट अँड रन प्रकरण : राजकीय नेत्याचा मुलगा असल्यानं मिहिर शाहच्या अटकेला दिरंगाई, मृत महिलेच्या पतीचा गंभीर आरोप - Worli Hit and Run Case
- वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाह अजूनही फरारच, पोलिसांकडून लूक आऊट सर्क्युलर - Worli Hit and Run Case