महाराष्ट्र

maharashtra

उरण हत्याकांड प्रकरणात अनुत्तरित प्रश्नांचा पोलिसांनी केला उलगडा - Uran massacre case

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 4:38 PM IST

Uran murder case : उरणमध्ये एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिलीय. यासह खून का झाला असावा? यावरही पोलिसांनीही भाष्य केलंय.

Dawood Sheikh
अटकेतील आरोपी दाऊद शेख (ETV Bharat MH Desk)

नवी मुंबई Uran Murder Case :उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात गेल्याचं साकोरे यांनी नमूद केलं.

अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच तरुणीची हत्या झाल्याची शक्यता आहे. - दीपक साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त

काय आहे प्रकरण? : गुरूवार, 25 जुलै रोजी उरणमधून एक 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वार करून तरुणीची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदनानंतर निष्पन्न झालं. याप्रकरणी शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीच्या हत्येप्रकरणी उरण शहरात संतापाची लाट उसळली. संशयित आरोपी दाऊद शेखला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दाऊद शेखला कर्नाटकातून अटक : दाऊद शेखनं तरुणीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके कर्नाटकात पाठवली होती. आरोपीच्या मित्रानं माहिती दिल्यानंतर दाऊद हा कर्नाटकातील अलार गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

दाऊदचा मित्र तरुणीच्या संपर्कात : दाऊदचा मित्र मोहसीन हा तरुणीच्या संपर्कात होता. दाऊदला अटक करण्यात मोहसीननं पोलिसांना मदत केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सुरू असून सद्यस्थिती एकच आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. दाऊद शेख हा कामानिमित्त उरणमध्ये राहत होता, पण कोविडनंतर तो कर्नाटकात ड्रायव्हर म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोघांमध्ये झालेल्या वादातून हत्या? :तरुणी तसंच दाऊद शेख दोघे मित्र होते. ते दोघे भेटले होते. मात्र, भेटीदरम्यान त्यांच्यात वाद झाला असावा. त्यातून आरोपीनं तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

'हे' वाचलंत का :

  1. उरण तरुणी हत्या प्रकरण : हत्येच्या अगोदर दाऊद करायचा पीडितेचा पाठलाग; सीसीटीव्ही फुटेजमधून झालं उघड - Uran Girl Murder Case
  2. उरण तरुणी हत्याकांड प्रकरण : आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकात ठोकल्या बेड्या - Uran Girl Murder Case

ABOUT THE AUTHOR

...view details