सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या मिरवणुकीत चोरट्यांनी हात की सफाई करत कार्यकर्त्यांचे 10 तोळ्याचे दगिने लंपास केले. तसंच अभिनेत्री श्वेता शिंदेंचे पिरवाडीतील बंद घर फोडून कपाटातील 10 तोळ्यांचे दागिने लांबवले आहेत. या घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, श्वेता शिंदे यांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून त्यांना घरफोडीची माहिती दिली.
कार्यकर्त्यांना मिरवणूक पडली महागात :सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर उदयनराजेंची साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात सफाई करत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे 10 तोळ्याचे दागिने लंपास केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अमर संजय जाधव (रा. कोडोली, सातारा) यांची साडे तीन तोळ्याची चेन आणि नरेश सिताराम अग्रवाल (रा. कराड) यांची साडे चार तोळ्याची चेन चोरट्यांनी लांबवली. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.