अहमदनगर Three Girls Died: मेंढवण येथील तीन मुली खेळण्यासाठी गेल्या असतांना. त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या: संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील अनुष्का सोमनाथ बडे (वय 11 वर्ष), सृष्टी उत्तम ठापसे (13 वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (12 वर्ष) या तिन्ही मैत्रिणी शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून खेळत खेळत सोमनाथ बडे यांच्या शेतातळ्याकडे गेल्या. शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. या मुली त्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या. यात त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनी परिसरात शोककळा पसरली आहे.