महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हमारे बारह'च्या दिग्दर्शकासह टीमला जीवे मारण्याच्या धमक्या, अन्नू कपूरनं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट - Annu Kapoor meets CM Shinde - ANNU KAPOOR MEETS CM SHINDE

अन्नू कपूरच्या 'हमारे बारह' या चित्रपटाला धमक्या येत आहेत. या धमक्यांदरम्यान अन्नू कपूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Annu Kapoor meets CM Shinde
अन्नू कपूरनं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट ((IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 12:47 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर त्याचा आगामी 'हमारे बारह' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्यानं गेल्या सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपल्याला आणि चित्रपटाच्या टीमला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल त्यानं मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं अन्नू कपूरनं सांगितलं. तो म्हणाला की, मुख्यमंत्र्यांनी टीमला धमकी देणाऱ्या घटकांपासून सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

अन्नू कपूरनं मीडियाला सांगितलं की, 'माझ्या 'हमारे बारह' चित्रपटाच्या संदर्भात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक कमल चंद्रा आणि चित्रपटाच्या टीमला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ज्या लोकांनी आम्हाला धमकी दिली त्यांनी कमलचंद्र यांचा शिरच्छेद करणार असल्याचे म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांना आणि टीमला आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. अन्नू कपूर पुढे म्हणाला, 'आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची खात्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रशासनाला दिली आहे 7 जून रोजी भारतासह अन्य 15 देशांमध्ये प्रदर्शित होणारा 'हमारे बारह' चित्रपट सुरक्षित राहावा, अशी खात्री दिली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येणार नाही.

'हमारे बारह' हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अन्नू कपूर, अश्विनी काळसेकर, मनोज जोशी, अभिमन्यू सिंग, पार्थ समथान, परितोष त्रिपाठी, अदिती भाटपहारी आणि इश्लिन प्रसाद यांसारख्या दिग्गज कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.

अलिकडे काही वर्षात चित्रपटांना विरोध करणं हे काही संघटना झुंडशाही पद्धतीनं करत असतात. चित्रपटात मांडलेला एखादा विषय पटला नाही तर त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची, त्या चित्रपटाच्या कलाकारांनी धमकी देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. 'हमारे बारह' हा चित्रपट म्हणजे 'हम दे हमारे दो' या सरकारी घोषणेच्या विरोधात असल्याचा दावा काही संघटनाकडून सुरू असून याला अनेक मुस्लीम संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर सरकारनं बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -

  1. बॉलिवूड सेलेब्स लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट्स, वाचा सविस्तर - lok sabha elections 2024
  2. बारामती लोकसभा निकाल 2024 : सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार? - Baramati Lok Sabha Results
  3. नवनीत राणा, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर; दिग्गजांना मोठा धक्का - Maharashtra lok Sabha election

ABOUT THE AUTHOR

...view details