महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेत बदल करण्याची मागणी मनसेनं केली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 9:31 PM IST

छत्रपती संभाजीनगरMazi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना एक पत्नी दोन मुले असणाऱ्यांना द्या, अशी मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना चांगली असून तिला विरोध नाही. मात्र, नियम तयार करताना त्यात त्रुटी आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या बंगलादेशी तसंच काही धर्मात चार बायका करण्याची मुभा आहे, अशा कुटुंबात एकाच घरात सर्वांना मदत करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत करत नियम कडक करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

दोन मुलांची अट :माझी लाडकी बहीण योजना राबवताना त्यात असलेले नियम कमकुवत आहेत. त्यामुळं गरजू कुटुंबीयांना फक्त मदत झाली पाहिजे. योजनेचा लाभ देताना त्यात कडक नियम करा, दोन मुलांची अट करा, एक बायको असा नियम करा. शोषितांना मदत करा. याबाबत सरकारनं नियोजन करावं. योजनेचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक नियम असतात, डोमेसाईल मागितलं जातं. मतदान करताना अनेक नियम आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नियम लावण्यात आले पाहिजे. कुणाच्या धर्माला विरोध नाही, पण सरकारनं विचार करावा, असं मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं.

राहुल गांधी अज्ञानी :राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांकडं पाठ करून बोलतात हा संसदेचा भंग आहे. सर्व हिंदू हिंसक असतात असं, म्हणणं चुकीचं आहे. आम्ही हिंदू शांत आहोत, म्हणून ऐकून घेतलं. इतर धर्मीय लोकांवर बोलून दाखवा. आतापर्यंत डोक्यावर बक्षीस लागलं असतं. तुमची आई तसंच वडील हिंदू नाहीत, त्यामुळं तुम्हाला माहीत नाही. गुरू नानकांनी धर्माची स्थापन करताना शस्त्र बाळगणं अनिवार्य केलं. कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. हिंदू धर्म असा नाही. कधीही हिंसा त्यांनी केली नाही. इतर देशांमध्ये हिंदूंनी आपले कलाशिल्प, वेगवेगळं आयुर्वेद शिक्षण नेलं, मात्र शस्त्रं कधीही नेली नाहीत. राहुल गांधी अज्ञानी आहेत, पण विरोधीपक्ष नेते आहेत, आता पाच वर्ष असंच पहावं लागेल, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

हे वाचलंत का :

  1. ड्रेसकोड लागू केल्याप्रकरणी आमदार सरनाईकांची मुंबईतील कॉलेजवर कारवाईची मागणी, म्हणाले हा 'तालिबानी फतवा' - mla Pratap Sarnaik
  2. रिक्षा चालकांच्या नियमाविरुद्ध आडम मास्तर आक्रमक : मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीत घेराव घालण्याचा दिला इशारा - CM Eknath Shinde
  3. ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details