छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- Husband found red handed : अनैतिक संबंधातून काय घडेल याचा काही नेम नाही. भांडण करून पत्नी माहेरी निघून गेल्यावर पतीनं काही दिवसातच नवी जोडीदारीन शोधली आणि रोमान्स सुरू केला. काही दिवसांनी पत्नी घरी परतली तर पती मैत्रीणीबरोबर घरी आढळून आला. रंगेहात पकडल्यावर भावाच्या मदतीनं पत्नीनं नवऱ्याला चोप दिला आणि त्याच्या मैत्रीणीला अद्दल घडवण्यासाठी चक्क गेटलाच बांधून घातलं. त्यामुळं पंचक्रोशीतील लोकांना चर्चा चर्वणासाठी एक नवा विषय मिळला आहे. वडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली असून पोलिसांच्या मदतीने महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
भांडून गेलेली पत्नी घरी आली अन्...
वडगाव येथे पन्नास वर्षीय इसम आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. एक दिवस त्यानं पत्नी आणि दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिलं. त्यामुळे पत्नी माहेरी जाऊन राहू लागली. एक मुलगा पुण्याला आणि एक गुजरातला कामानिमित्त निघून गेले. मात्र बुधवारी ही महिला भावाला भेटण्यासाठी वाळूज परिसरात दाखल झाली, त्यावेळी घरी काय चाललं हे बघण्यासाठी ती आपल्या घरी गेली. त्यावेळी तिचा नवरा आपल्या मैत्रिणीबरोबर रोमान्स करत असल्याचा दिसून आला. तिनं भावाच्या मदतीने नवऱ्याला रंगे हात पकडलं आणि त्यानंतर त्याला चोप तर दिलाच मात्र त्याच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीलाही चोप देत घराबाहेरील गेटला बांधून ठेवलं. हा प्रकार कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती, मात्र त्या महिलेला सोडवण्याची हिंमत कोणीही करू शकला नाही.