मुंबई -मुंबईतील लालबागच्या राजाची ख्याती देशभर पसरलीय. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. तर गणेश भाविकांना पावणारा गणपती म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील गणपती, अशी ओळख सिद्धिविनायक मंदिराची आहे. मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणून सिद्धिविनायक मंदिराकडे पाहिले जाते. इथे दररोज हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र आता सिद्धिविनायक मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही बुधवारपासून (11 डिसेंबर) बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर आताच थांबा, अन् ही बातमी वाचा. कारण बुधवार (11 डिसेंबर) पासून पुढील पाच दिवस म्हणजे 16 डिसेंबरपर्यंत सिद्धिविनायक मंदिरातील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही.
प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन पाच दिवसांसाठी बंद, कारण काय?
बुधवार (11 डिसेंबर) पासून पुढील पाच दिवस म्हणजे 16 डिसेंबरपर्यंत सिद्धिविनायक मंदिरातील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. ते बंद राहणार आहे.
Published : 6 hours ago
दर्शन पाच दिवस बंद का? : मुंबईतील प्रसिद्ध गणपती अशी सिद्धिविनायक मंदिराची ओळख आहे. आता हे मंदिर बुधवारपासून (11 डिसेंबर) पुढील पाच दिवस भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. कारण माघी गणेशोत्साच्या तयारीकरिता पुढील पाच दिवस मंदिरातील बाप्पाचे दर्शन बंद राहणार आहे, असं सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं म्हटलंय. सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन आणि विधी करण्याचे काम आजपासून पुढील पाच दिवस होणार आहे. मुंबईत माघी गणेशोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या धर्तीवर लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. या कारणामुळं भाविकांना पुढील पाच दिवस म्हणजे बुधवारपासून 11 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत दर्शन घेता येणार नाही, असं मंदिर प्रशासनानं म्हटलं आहे.
दर्शनासाठी पर्यायी व्यवस्था :5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सकाळी सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शपथ घेतली होती. बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब मुंबईकर रांगा लावतात. पण आता पुढील पाच दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. त्यामुळं मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. मूळ मूर्तीच्या समोरच सिद्धिविनायक लाडक्या बाप्पाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून, त्या प्रतिकृतीचे दर्शन पुढील पाच दिवस भाविक घेऊ शकतील अशी पर्यायी व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्याच्यात तयारीसाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून, या धर्तीवर लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -