ठाणे :जेवणाच्या पार्टीत चिकन पीसवरुन वाद होऊन एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प तीनमधील काजल पेट्रोल पंप नजीक घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगर पोलीस परिमंडळ 4 च्या हद्दीत पाच दिवसात ही तिसरी निर्घृण हत्या झाल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
'चिकन पीस' खाण्यावरुन मित्राची हत्या, पाच दिवसात तीन जणांच्या हत्येनं ठाण्यात खळबळ - THANE CRIME
जेवणाच्या पार्टीमध्ये चिकन पीस (तुकडे) जास्त घेण्याच्या कारणावरुन एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेनंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली.
Published : Oct 29, 2024, 11:32 AM IST
नेमकं काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजा इब्राहिम आणि आरोपी शेख हे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागात राहत होते. दोघंही चांगले मित्र होते. रविवारी राजा इब्राहिम यानं जेवणासाठी चिकन पार्सल आणलं होतं. जेवण करण्यासाठी दोघंही काजल पेट्रोल पंप जवळ बसले. मात्र, जेवण करत असतांना चिकन पीस जास्त घेण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी शेख यानं आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
आरोपी मित्राला अटक :घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आरोपी शेखवर हत्येचा गुन्हा दाखल करत मध्यवर्तीय पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. तसंच या घटनेचा अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या काळातच शहरात पाच दिवसात तीन जणांची हत्या झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यवसायिकाची अंबरनाथमध्ये भर रस्त्यातच निर्घृण हत्या झाली. त्या पाठोपाठ गुरुवारी रात्रीच्या सुमारास उल्हासनगर मध्येही भर रस्त्यातच व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
हेही वाचा -