महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणच्या आधारवाडी जेलमधील न्यायबंदींमध्ये तुफान राडा, सात जणांवर गुन्हा दाखल - CLASH BETWEEN PRISONERS IN JAIL

कल्याणच्या आधारवाडी जेलमधील न्यायबंदींमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी सात न्यायबंदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

clash between prisoners in Kalyan Aadharwadi Jail, case has been registered against seven prisoners
कल्याणच्या आधारवाडी जेलमधील न्यायबंदींमध्ये राडा (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 9:10 AM IST

ठाणे : कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी जेलमधील (Kalyan Aadharwadi Jail) शौचालयात सात न्यायबंदींनी राडा (clash between prisoners) घालून एका न्यायबंदीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. न्यायबंदीच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलीस ठाण्यात सात राडेबाज न्यायबंदींविरोधात गुन्हा दाखल (case has been registered against seven prisoners) करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील रेल्वे सुरक्षा दलात नोकरीला असलेला एक जवान आधारवाडी जेलमध्ये एका गुन्ह्यात न्यायबंदी म्हणून दाखल आहे. मंगळवारी (3 डिसेंबर) सकाळी संबंधित न्यायबंदी जवान जेलमधील सार्वजनिक नळाजवळ उभा होता. त्यावेळी त्याच्या बाजूला उभा असलेल्या जेलमधील रखवालदार न्यायबंदीला मारण्यासाठी सातजणं पळत आले. मात्र, त्यांनी काही करण्यापूर्वीच जवान असलेल्या न्यायबंद्यानं मध्यस्थी करुन सातही जणांना तिथून परतवून लावलं. याचाच बदला घेण्यासाठी सातही न्यायबंदींनी या घटनेच्या काही वेळानंतर न्यायबंदी जवान स्वच्छतागृहाबाहेर (शौचालयात) येताच त्याला दगड आणि बादलीनं बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत संबंधित न्यायबंदी गंभीर जखमी झालाय.

गुन्हा दाखल : या राड्या प्रकरणी आधारवाडी कारागृहमधील एका अधिकाऱ्यानं घटनेच्या लेखी माहितीचं पत्र महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिले. आता महात्मा फुले पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या न्यायबंदीचा जबाब घेऊन सात न्यायबंदींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. तसंच या प्रकरणी पोलीस तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. येरवडा कारागृहात चक्क बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन, बंदीवान म्हणाले... - Yerwada Jail
  2. खुल्या कारागृहाचा सुधारगृहाकडे प्रवास; कैदी करतायत शेती, भाज्यांची विक्री आणि बरंच काही

ABOUT THE AUTHOR

...view details