ठाणेChild Kidnapping in Thane :सहा महिन्याच्या चिमुकल्याचं आईच्या कुशीतून अपहरण करण्यात आल्याची घटना कल्याण पश्चिम भागातील कल्याण - मुरबाड मार्गावर असलेल्या एका चर्च समोरील बस स्टँडवर घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखला होताच पोलिसांनी शिताफीने तपासाची जलद चक्रे फिरवून अपहरण झालेल्या चिमुकल्याची १२ तासातच सुखरूप सुटका केली.
अरबाज समीर शेख असे सुटका करण्यात आलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तर दिनेश भैयालाल सरोज (वय २५, रा. राजकुमार चाळ, उल्हासनगर कँम्प नंबर २) असे अटक केलेल्या अपहरणकर्त्याचं नाव आहे. तर त्याचा साथीदार अंकितकुमार राजेंद्रकुमार प्रजापती (वय, २५, रा. राजकुमार चाळ, उल्हासनगर कँम्प नंबर २) असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे.
असा केलं अपहरण: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश सरोज हा उल्हासनगर कँम्प नंबर २ भागातील राजकुमार चाळीत राहत असून त्याला पत्नी आणि चार मुलं आहेत. तो रिक्षाचालक आहे. तर त्याचा साथीदार आरोपी अंकितकुमार प्रजापती हाही त्याच चाळीत राहत असून तो टेलरकाम करतो. तक्रारदार आयेशा समीर शेख (२०) ही आपल्या पती समीर शेख आणि सहा महिन्याच्या अरबाजसह कल्याण पश्चिम भागातील कल्याण - मुरबाड मार्गावर असलेल्या एका चर्च समोरील बस स्टँपवरील फुटपाथवर वास्तव्यास आहेत. त्या मूळच्या सिन्नर रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत. रोजीरोटीच्या शोधात पती-पत्नी कल्याणला भंगार गोळा करून पोटाची खळगी भरून फुटपाथवर संसार थाटला आहे. ८ जून रोजी पहाटे १ ते ४ च्या सुमारास चिमुकला आपल्या आईच्या कुशीत झोपला होता. त्याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक दिनेशनं अरबाजचं अपहरण केलं. दुसरीकडे या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण मार्गावरील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते.