महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शौचालय वापरून 5 रुपये न दिल्यानं बाप-लेकाकडून अ‍ॅसिड हल्ला; तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा - Thane Acid attack

Thane Acid attack : बदलापूर रेल्वे स्थानकावरील शौचालय चालवणाऱ्या ठेकेदारानं क्षुल्लक कारणावरून 28 वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर बाथरुम साफ करण्यासाठी असलेलं अ‍ॅसिड फेकलं. दोघांमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या शुल्कावरून वाद झाला होता.

Thane Acid attack
तरूणावर ॲसिड हल्ला (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 10:22 PM IST

ठाणे Thane Acid attack : रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये शौच करण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीनं 5 रुपये सुट्टे नसल्याचं सांगितलं. शौचालयाच्या ठेकेदारानं आणि त्याच्या 15 वर्षीय मुलानं त्या व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून डोळ्याला गंभीर दुखापत केली. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या शौचालयात घडली. याप्रकरणी पोलिसांनी योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय 47 ) याला अटक केलीय.

5 रुपये न दिल्यानं एसिड हल्ला : रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तक्रारदार विनायक बाविस्कर (वय 28) हे 19 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शौचालयाचमध्ये गेले होते. शौच करून बाहेर आल्यानंतर बाप-लेकानं विनायककडे 5 रुपयाची मागणी केली. मात्र विनायककडे सुट्टे 5 रुपये नसल्यानं त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी बाप-लेकानं मिळून विनायकला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अ‍ॅसिड फेकलं. या हल्ल्यात विनायकच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलाची बालसुधारगृहात रवानगी :घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत बाप-लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर विनायक यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 124 (1) 352, 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे शौचालय चालक योगेशकुमार याला अटक केली. त्याच्या 15 वर्षीय मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली. उद्या (मंगळवारी) आरोपी योगेशकुमारला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

हेही वाचा

  1. मिहीर शाहच्या अर्जावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता - BMW hit and run case
  2. दर्ग्याच्या दर्शनाकरिता गेलेल्या तिघांचा महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश - Mahad drown death news
  3. जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक - Bhiwandi Crime News

ABOUT THE AUTHOR

...view details