ठाणे 73 Year Old Man Raped Minor Girl :घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन ओळखीच्या एका 73 वर्षीय नराधमानं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं तोंड दाबत बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. निसार ठाणगे असं अटकेतील नराधमाचं नाव आहे. अत्याचार करताना या नराधमानं पीडितेला तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही पीडितेनं पोलिसांना सांगितलं.
दुपारी पीडिता एकटी असताना केला बलात्कार :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातील एका कॉलनीत कुटुंबासह राहते. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर 73 वर्षीय नराधम हा रायगड जिल्ह्यातील नेरळ भागात असलेल्या एका गावात राहतो. गेल्या काही वर्षांपासून पीडित मुलीच्या कुटूंबाची ओळख असल्यानं आरोपी नराधम हा पीडितेच्या घरी येत जात असे, त्यामुळं पीडित मुलगी आणि नराधम एकमेकांना ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेऊन नराधम 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून नारधामानं पीडितेशी अश्लील चाळे केले. या घटनेमुळं पीडित मुलगी घाबरुन तिनं त्याला विरोध केला. मात्र तिच्या विरोधाला न जुमनता त्यानं तिच्या घरातच तुझ्या आईला ठार मारणार अशी धमकी देत, तिच्यावर बलात्कार केला.