महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव वेगातील ट्रकनं चिरडल्यानं माय-लेकाचा मृत्यू; अपघातानंतर प्रकाश भोईर यांचा रास्ता रोको - THANE ACCIDENT

कल्याण पश्चिम भागातील आग्रा रोडवर ट्रक चालकाच्या धडकेत बुधवारी आई-मुलगा ठार झाले आहेत. अपघात होत असल्यानं उड्डाणपूल आणि दुभाजकसारख्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेनं केली.

Thane Accident
प्रतिकात्मक- कल्याण अपघात (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2025, 9:13 AM IST

Updated : Jan 9, 2025, 12:15 PM IST

ठाणे - ट्र्क चालकानं भरधाव ट्र्क नेत रस्त्यावर चालणाऱ्या आईसह तिच्या चार वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील आग्रा रोडवरील श्री दक्षिण मारुती मंदिर चौकात घडली आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असं अपघातात जागीच ठार झालेल्या आई आणि मुलाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील लालचौकी परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास निशा सोमेसकर आणि त्यांचा मुलगा अंश सोमेसकर हे दोघेही कल्याण पश्चिम भागातील आग्रारोड वरील श्री दक्षिण मारुती मंदिर चौकात रस्ता ओलंडत होते. त्याच सुमारास सहजानंद चौकातून लालचौकीकडे कचरा भरलेला ट्रक भरधाव वेगानं जात होता. या ट्रकनं दोघा माय-लेकाला जोरदार धडक देऊन चिरडले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

कल्याणमधील रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर (Source- ETV Bharat Reporter)

ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात-अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करत घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघात प्रकरणात बाजपरपेठ पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. ट्र्क चालक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्र्कवर चालक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

''कल्याणमध्ये रस्ते अपघात सतत होत आहेत. रस्ता एमएमआरडीकडे दिल्यानं कल्याण महापालिका लक्ष देत नाही. वाहतूक पोलीस आणि वाहतूक सिग्नलदेखील नाहीत. या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, सिग्नल यंत्रणा आणि दुभाजक सुरू करावा, अशी आमची मागणी आहे."-माजी आमदार, प्रकाश भोईर

मार्गावर घडलेत 15 ते 20 अपघात:भीषण अपघाताच्या घटनेनंतर कल्याण पश्चिम परिसरात मनसे आक्रमक झाली. रस्त्यावरील दुभाजक तुटल्यानं भीषण अपघात झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. माजी आमदार प्रकाश भोईर आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं. अपघात होऊन तासाभराचा कालावधी उलटूनही केडीएमसी अधिकारी घटनास्थळी आला नसल्यानं माजी आमदार भोईर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांच्या शांत राहण्याची विनंती केली. अपघातावर लवकरच उपायोजना करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यात या मार्गावर 15 ते 20 अपघात झाले आहेत. यावर ठोस उपयोजना करण्याचं गरजेचं असल्याचं भीषण अपघातावरून दिसून आलं आहे.

हेही वाचा-

  1. 2024 मध्ये सुमारे 1.80 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू, केंद्र सरकारनं घेतला 'हा' निर्णय
  2. चालकाचं नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, 8 गंभीर
Last Updated : Jan 9, 2025, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details