मुंबई-महाराष्ट्रातील मुंबईतील पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी फोनद्वारे देण्यात आलीय. कॉल आल्यानंतर लगेचच पोलीस सक्रिय झालेत, तसेच आता निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा केलाय, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर : खरं तर मंगळवारी हा फोन आला, त्यानंतर पोलिसांनी इतर एजन्सींनाही कळवले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत आणि तेथून ते अमेरिकेला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असा दावा फोन करणाऱ्याने केल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरून सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलंय. मंगळवारी (11 फेब्रुवारी) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला, ज्यामध्ये इशारा देण्यात आला होता की, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात.