महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी - fighter plane crashes - FIGHTER PLANE CRASHES

Sukhoi 30 fighter plane crashes : नाशिकमध्ये सुखोई 30 फायटर विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानाचा पायलट जखमी झालाय.

Sukhoi 30 fighter plane crashes
नाशिकमध्ये सुखोई विमान कोसळलं (Reporter ETV Bharat MH)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 2:55 PM IST

नाशिक Sukhoi 30 fighter plane crashes: नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई 30 हे लढाऊ विमान कोसळलंय. निफाड येथील शिरजगाव परिसरातील शेतात विमान कोसळलं. यात पायलट जखमी झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. नाशिकच्या ओझर येथील एच. ए. एल. येथून सुखोई 30 या लढाऊ विमानानं आज दुपारी उड्डाण घेतलं होतं. मात्र अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानातील दोन्ही पायलटनं प्रसंगावधान दाखवत हे विमान निफाड तालुक्यातील शिरजगाव येथील मोकळ्या शेतात कोसळलं. मात्र, त्या आधी दोन्ही वैमानिकांनी पॅरॅशूटच्या साह्यानं विमानाबाहेर उडी घेतली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. तसंच या घटनेत विमान पूर्णतः जळून खाक झालंय. नेमका अपघात कशामुळं झाला आहे, याचा तपास आता एच. ए. एल करणार आहे. विमान कोसळल्याची बातमी कळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details