नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगो एअर लाईन्सच्या ए 320 प्रवासी विमानानं यशस्वी लँडिंग केलं. या विमानातून विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकार्यांच्या पथकानं प्रवास केला. हे लँडिंग विमानतळाच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरलं आहे. विमान यशस्वीपणे लँड झाल्यानंतर वॉटर सलामी देण्यात आली आणि टाळ्या वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. आकाशात तीन ते चार घिरट्या घालून विमान 17 एप्रिल 2025 रोजी हे व्यावसायिक विमान आणि कार्गो विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं जाणारं आहे, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जवळपास जून उजाडणार असल्याची माहिती सीईओ बीव्ही जेके शर्मा यांनी दिली.
यापूर्वी या लढाऊ विमानांचं यशस्वी लँडिंग: यापूर्वी, वायुदलाचे सी-295 आणि सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग या विमानतळावर झालं होतं. यामुळं धावपट्टीच्या मजबुती आणि तांत्रिक कार्यक्षमतेची चाचणी पूर्ण झाली आहे. दिल्लीहून विमान सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी आणि तज्ज्ञांचे पथक यांच्यासह नवी मुंबई विमानतळावर उतरलेलं पहिलं व्यावसायिक विमान आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळावर इंडिगो ए 320ची यशस्वी लँडिंग (ETV Bharat Reporter)
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असून, त्याची धावपट्टी 3.7 किमी लांब आहे. एकाचवेळी 350 विमाने आणि 76 खासगी विमाने उभी राहण्याची क्षमता या विमानतळावर आहे. एप्रिल 2025 पासून येथे नियमित व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. यशस्वी चाचणीमुळं नवी मुंबई विमानतळाची उभारणी अधिक वेगानं पूर्ण होण्यास मदत होईल आणि हा प्रकल्प जागतिक दर्जाचा विमानतळ बनण्याच्या दिशेनं पुढं जाईल, असं शर्मा यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जवळपास जून उजाडणार : 17 एप्रिल 2025 व्यावसायिक विमान आणि कार्गो विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं जाणार आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जवळपास जून उजाडणार आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
हेही वाचा -
- वडिलांना विमानात सोडण्यासाठी त्यानं बनविले बनावट तिकीट, अटकेतील आरोपीची चौकशी सुरू - Fake flight ticket
- इंडिगो विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
- इंडिगोला 1.20 कोटी तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला 60 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?