महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशांचा मृत्यू - Sindhudurg Boat Accident

निवती समुद्रातून मच्छिमारी करुन परत येत असताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन खलांशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

Sindhudurg fishing boat overturned in the nivati sea, two sailors died
निवती समुद्रात मच्छिमारी बोट उलटून दोन खलाशांचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 1:35 PM IST

सिंधुदुर्ग : निवती समुद्रातून मच्छिमारी करुन परत येत असताना निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची बोट उलटून दोन खलाशांचा मृत्यू झालाय. या बोटीमध्ये एकूण 14 खलाशी होते.

समुद्र किनाऱ्यापासून 200 मीटर अंतरावर बुडाली बोट : शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्री 8 वाजेच्या सुमारास निवती येथील मच्छिमार आनंद धुरी त्यांच्या बोटीतून एकूण 14 खलाशांना घेऊन समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या नंतर त्यांनी निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली.

समुद्र किनाऱ्यापासून 200 मीटर अंतर असताना ही बोट बुडाली. यातील मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर हे श्रीरामवाडी कोचरा येथील आणि येरागी खलाशी हे खवणे येथील रहिवासी होते. या दुर्घटनेमुळं निवती गावात दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा -

  1. मासेमारी करणारी बोट समुद्रात अडकली; 17 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश - Fishing Boat Stuck In Sea
  2. अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या जहाजावर अडकले 14 जण, बचावकार्य सुरू; पाहा व्हिडिओ - Raigad Ship Stuck in Sea
  3. आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला लागलेल्या आगीत खलाशी बेपत्ता ; नौदलाला आढळला जवानाचा मृतदेह - INS Brahmaputra Fire

ABOUT THE AUTHOR

...view details