नागपूर Natural Farming on Building Teres: शहरी जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळं जिकडं-तिकडं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रोजच्या आहारातील प्रत्येक घटकचं आता विषारी रासायनिक झाला आहे. त्यामुळं कळत-नकळत हजारो रुपये रुग्णालय आणि औषधांवर खर्च केले जातात. ही समस्या दरवर्षी वाढतचं जाणार आहे. त्यामुळं या समस्येवर उपाय म्हणून नागपूरच्या एका गृहस्थानं चक्क अपार्टमेंटच्या छतावर 'जैविक शेतीचा' यशस्वी प्रयोग (Organic Farming) करून दाखवला आहे.
घराच्या छतावरच जैविक शेती: श्रीपत राठोड यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री आणि दोन्ही मुली देखील या जैविक शेतीसाठी काम करतात. राठोड यांचं हे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग करत आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून ते नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला आणि फळे आहारात खातात. त्यामुळं गेल्या दहा वर्षात या कुटुंबानं ताप, सर्दी, खोकला या सारख्या किरकोळ आजारावर 5 हजार रुपये देखील खर्च केलेला नाही. त्यामुळं निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नैसर्गिक फळे आणि भाज्याचा उपयोग हा किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध होतय.
छतावरच फुलवली 'परसबाग' : श्रीपत राठोड आणि त्यांचं कुटुंब मनीषनगर येथे गेल्या 10 वर्षापासून वास्तव्यास आहे. यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे राहायचे. तिथे देखील त्यांनी अशाच प्रकारच्या जैविक पद्धतीचा अवलंब करून घरात परसबाग फुलवली होती. नागपूरला राहण्यासाठी आल्यानंतरही जैविक शेतीची गोडी त्यांना स्वस्थ बसू देत नसल्यानं त्यांनी अपार्टमेंटच्या छतावरचं जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला. आज या प्रयोगाला दहा वर्षे पूर्ण झाली. आता या शेतीचं रूपांतर समृद्ध 'परसबागेत' झालं आहे.
आर्थिक बचत, विषमुक्त शरीर, हीच खरी कमाई :आजकाल जिकडं-तिकडं रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रभाव असलेल्या भाजीपाला, फळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं गंभीर आजार तर होतो, शिवाय आरोग्यावर विपरित परिणाम नेहमीच होत असतो. यावर उपाय शोधताना श्रीपत राठोड आणि त्यांच्या कुटुंबानं जैविक शेतीच्या यशस्वी प्रयोगातून आर्थिक बचत तर केलीचं आहे, शिवाय परिवाराला बाराही महिने ताज्या भाजीपाला खावू घालून आरोग्यही ठणठणीत ठेवलं आहे. ही अनोखी परसबाग नागपुरात चर्चेचा विषय ठरत आहे.