ठाणे Dharmaveer Anand Dighe :मागील काही दशकांपासून आनंद दिघे आणि निवडणुका हे समीकरण प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळत होतं. यंदाची लोकसभा निवडणूक विकासकामं, आश्वासनं या मुद्द्यांवर न होता आनंद दिघे यांच्या नावानं होणाऱ्या आरोप प्रत्यारोपानं गाजत आहे. यावर्षी निवडणुका होत असताना आनंद दिघे यांची मालमत्ता, धर्मवीर सिनेमा आणि त्यांना त्रास दिल्याचे आरोप आणि एकनिष्ठपणा या मुद्द्यांवर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी आनंद दिघे यांचं गद्दाराना क्षमा नाही, या वक्तव्याचा वापर देखील होत आहे.
आनंद दिघे यांच्या नावाशीवाय पर्याय नाही :ठाण्यात आनंद दिघे हे नाव घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पार पडत नव्हती. मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्वच पक्ष आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत आहेत. मात्र बदलत्या समीकरणांमुळे आणि शिवसेनेतच पडलेल्या उभ्या फुटीमुळे धर्मवीर आनंद दिघे यांचा वापर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही होत आहे. दोन दशकांपूर्वी आनंद दिघे यांचं निधन झालं, मात्र आजही निवडणुका लढण्यासाठी आनंद दिघे यांचं नाव घेतल्याशिवाय ठाण्यात मत मिळत नाहीत, हे पुन्हा एकदा प्रचार सभेमधून दिसून आलं. आनंद दिघे यांची मालमत्ता त्यांचे शिष्य आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा वापर आता ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केला जात आहे.
आता झाला धर्मवीर सिनेमा वाद :आनंद दिघे यांच्या जीवनावर धर्मवीर हा सिनेमा काढण्यात आला. त्याचा दुसरा पार्ट काढण्यात येत आहे. असं असताना या सिनेमातील काही सीन खरे आणि खोटे असे आरोप प्रत्यारोप होवू लागले आहेत. या वादातून मत मिळवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.