नाशिकात उभारली हेल्मेटची गुढी नाशिक Gudi Padwa 2024:आजच्या जगात रस्ते अपघात (Road Accident) मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ज्याचं मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडं लक्ष न देणं. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं आणि वाहतुकीच्या नियमांकडं दुर्लक्ष करणं, यामुळं रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्ते सुरक्षेचे नियम पाळले जावोत आणि सर्वसामान्यांना त्याबाबत माहिती व्हावी, यासाठी नाशिकच्या इंदिरा नगर भागात राहणाऱ्या राहुल शिंपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी (Shimpi Family) अनोखी गुढी उभारलीय.
गुढीलारस्ता सुरक्षेबाबत माहिती असलेला हार : यात गुढीला कळसा ऐवजी चक्क हेल्मेट ठेवून सुरक्षेचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलाय. तसेच रस्ता सुरक्षेबाबत माहिती असलेला हार या गुढीला वाहण्यात आलाय. त्यात नशा करून वाहने चालवू नये, हेल्मेटचं महत्व, ट्रॅफिक सिग्नल बाबतची माहिती, पोलीस मित्र, वेगाचं भाण, टॅफिक सूचना, आदींची माहिती त्यात दर्शवली आहे. या अनोख्या गुढीद्वारे (Helmet Gudi) समाज प्रबोधनाचं कार्य शिंपी कुटुंबीयांनी केलंय.
नाशिक शहरात शोभा यात्रा: गंगापूर रोड परिसरातून नववर्ष स्वागत यात्रा पश्चिम विभागातर्फे काढण्यात आली होती. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे शिवकालीन शास्त्रांचे खेळ सूरज देवरे यांनी प्रशिक्षित केलेले 6 ते 16 वयोगटातील मुले होती. या मुलांनी तलवार, दांड पट्टा, लाठी काठी, चक्र असे विविध खेळ सदर केले. श्रीरामाच्या मूर्तीला पुष्प हर अर्पण करून आणि गुढीची पूजा करून स्वागत यात्रेस प्रारंभ झाला. स्वागत यात्रा नरसिंह नगर मारुती मंदिर, दाते नगर, मॉडर्न मार्केट चौक, शांतिनिकेतन चौक, आकाशवाणी भाजी मार्केट, तुळजा भवानी मंदिर, थत्ते नगर मार्गे बी.वाय.के कॉलेज चौक येथे संपन्न झाली. या स्वागत यात्रेत परिसरातील नागरिक, महिला, नसती उठाठेव मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा -
- पुणेकरांनो सावधान! नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी पदभार घेताच हेल्मेटबाबत घेतला मोठा निर्णय
- चायनीज मांजामुळं दोघं गंभीर जखमी; हेल्मेट घालूनही महिला रक्तबंबाळ
- Thane RTO Decision: विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना आता शासकीय, खासगी आस्थापनामध्ये 'नो एन्ट्री'! ठाणे आरटीओचा निर्णय