महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात फुटबॉल टर्फवर पत्रा पडून दुर्घटना, सात मुलं जखमी - Shed Fell On a Football Ground - SHED FELL ON A FOOTBALL GROUND

Shed Fell On a Football Ground : ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. गावंड पार्क येथील फुटबॉल टर्फवर (Football Ground) वाऱ्यामुळं उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यात तिथे फुटबॉल खेळणारी सात मुलं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, तिथे असणाऱ्यांनी दिली आहे.

Football Ground
लोखंडी पत्रा पडून सात मुले जखमी (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 3:50 PM IST

ठाणे Shed Fell On a Football Ground: ठाण्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्यानं ठिकठिकाणी झाडं पडण्याच्या तसंच पत्रे उडण्याच्या घटना घडत आहेत. यात लुईसवाडीत वार्‍यानं आणि मुसळधार पावसामुळं चार झाडं पडली आहेत. तर गावंडबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ (Football Ground) आहे. येथील टर्फवर वाऱ्यामुळं उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यात तिथे फुटबॉल खेळणारी दोन मुलं किरकोळ तर पाच मुलं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे. या मुलांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

प्रतिक्रिया देताना प्रत्यक्षदर्शी तरुण (ETV BHARAT Reporter)



प्रताप सरनाईकांनी दिली भेट :ठाण्यातील लुईसवाडी परिसरात पप्पू ढाबा या ठिकाणी पावसामुळं आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं ४ झाडं पार्किंग केलेल्या वाहनावर पडली. या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. तर वर्तकनगर येथील वेदान्त कॉम्प्लेक्सच्या मागे असलेली भिंत पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. या अपघातानंतर प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात भेट देत जखमी मुलांची विचारपूस केली. या सातही मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोकादायक नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

या भागात मेघगर्जनेसह पाऊस: भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याचबरोबर उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडं विदर्भातही काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details