महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'होय मी भटकती आत्मा'; माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी अस्वस्थ होतो - शरद पवार - Sharad Pawar replied Narendra Modi - SHARAD PAWAR REPLIED NARENDRA MODI

Sharad Pawar replied Narendra Modi - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या सभेत शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर शरद पवार यांनी चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे. आपण लोकांच्या कल्याणासाठी भटकणारा आत्मा असल्याचं पवारांनी म्हटलंय.

शरद पवार
शरद पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:03 PM IST

पुणे Sharad Pawar replied Narendra Modi: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की माझा आत्मा हा अस्वस्थ आहे. पण माझा आत्मा स्वतःसाठी अस्वस्थ नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन, असं सडेतोड प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिलं आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार अशोक पवार,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.



यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्का ही वापर करत नाही. खरं तर जे राजकारणी चांगलं काम करतात त्यांच्या विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेनं जात आहे, हे स्पष्ट दिसत आहे. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय असं यावेळी शरद पवार म्हणाले.

राज्यातील निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा चांगलाच जोर लावला आहे. सलग दोन दिवसात महाराष्ट्रात मोदींच्या एकूण ६ सभा झाल्यात. या सभांच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्याला काँग्रेस, ठाकरे शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

हेही वाचा..

  1. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha
  2. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश, इथं गुजरातचा आत्मा भटकतोय ; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi
  3. तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting

ABOUT THE AUTHOR

...view details