महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'देशानं यापूर्वी तडीपार गृहमंत्री पाहिला नाही, गृहमंत्रिपदाची गरीमा राखा'; शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार - SHARAD PAWAR NEWS

राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवारांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

Sharad Pawar criticizes Amit Shah
संग्रहित- शरद पवार (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2025, 1:13 PM IST

Updated : Jan 14, 2025, 10:55 PM IST

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीमधील भाजपाच्या महाविजय अधिवेशनात केलेल्या टीकेला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "देशानं अनेक उत्तम प्रशासक आणि गृहमंत्री पाहिले आहेत. मात्र, देशानं तडीपार केलेले गृहमंत्री पाहिले नाहीत", असा टोला राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांना ( Sharad Pawar criticizes Amit Shah) लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी 'इंडिया' आघाडीतील वादावर भाष्य केलं.

भाजपाचा सहकाऱ्यांना सूचक इशारा :1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी होते. याबाबत गृहमंत्र्यांना कदाचित माहिती नसावी. पुलोद सरकारनं राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. जनसंघाच्या नेत्यांनी माझ्यासोबत काम केलं, असा उल्लेख शरद पवार यांनी केला. आपल्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान व्यक्ती होत्या, असं त्यांनी सांगितलं. "अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा सर्वांशी सुसंवाद होता. वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या आपत्ती निवारण समितीचे प्रमुख पद मला देऊन कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला," असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार (Reporter)

कुठं इंद्राचा ऐरावत अन्न कुठं शामभट्टाची तट्टाणी :आपल्याबाबत आणि उद्धव ठाकरेंबाबत टीका करण्यात आली. मात्र त्यांना पूर्वीची माहिती नसावी. याबाबत त्यांनी 'कुठं इंद्राचा ऐरावत अन् कुठं शामभट्टाची तट्टाणी' ही मराठी म्हण येथे लागू पडत असल्याचा टोला लगावला. "आमच्यावर गद्दारीचा आरोप करणाऱ्यांना आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता किंवा कोणतीही कमिटमेंट केलेली नव्हती," असा खुलासा शरद पवारांनी केला.

'त्यांची' ती लेव्हलच नाही :"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली टीका जिव्हारी लागली नाही. त्यांची टीका जिव्हारी लागावी, अशी नोंद घेण्याची ती व्यक्ती नाही, त्यांची ती लेव्हलच नाही," असा टोला पवारांनी लगावला.

स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत लवकरच बैठक :"'इंडिया' आघाडीमध्ये संवाद आहे. ही आघाडी बनवताना देशपातळीवर एकत्र लढण्याचा निर्णय होता. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर एकत्र लढण्याबाबत आघाडीत कधीही चर्चा झालेली नाही. मात्र, यावर चर्चा करण्याची गरज काही सहकाऱ्यांनी मांडली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या भूमिकेत सातत्य ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात मविआतील काँग्रेस, उबाठा आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांसोबत एकत्र बसून राज्यात एकत्रित लढण्याबाबत विचार करु," असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

संतोष देशमुख प्रकरण चिंताजनक :बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात त्याबाबत प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहे. हे सर्व प्रकरण चिंताजनक आहे. याबाबत राज्यभरात जी चर्चा होत आहे, त्याची राज्यकर्त्यांनी नोंद घेण्याची आणि त्याप्रमाणं कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजात एकवाक्यता आणि सामजंस्याचं वातावरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गृहमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे :"गृहमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे. ४० वर्षांपूर्वी टीका करणारे गृहमंत्री कुठे होते, हे माहित नाही. जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलं आहे. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचं नेतृत्व प्रभावी होते. आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता. आता तसे दिसत नाही. आताच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही. उद्धव ठाकरेही बाळासाहेबांच्या टीकेला उत्तर देतील".

हेवी वाचा :

  1. "देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री, पण कोणी तडीपार झाले नव्हते," शरद पवारांचा अमित शाहांना टोला
  2. “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं", अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार
  3. महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडी ? : शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न, आरोप प्रत्यारोपावरुन रंगलं राजकारण
Last Updated : Jan 14, 2025, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details