ठाणेSex Racket Dombivli : डोंबिवलीतील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील एका हायप्रोफाईल सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील मसाज पार्लर चालवणाऱ्या महिलेविरुध्द पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयश्री प्रमोद मुंढे असं मसाज पार्लरच्या नावानं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपी महिला दलालाचं नाव आहे.
'या' कारणानं आल्या शरीरविक्रय व्यवसायात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दलाल ही हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या शंखेश्वर गृह संकुलात संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा नावानं मसाज पार्लर चालवत होती. या पार्लरमधून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. या महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शरीरविक्रय व्यवसायात उतरल्या होत्या, असं पोलीस तपासात उघडकीला आलं.
अनोळखी व्यक्तीनं दिली माहिती :ठाणे येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तीनं संपर्क साधला. डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत मसाज पार्लरच्या नावानं वेश्या व्यवसाय चालवला जात आहे, अशी माहिती दिली. संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा शाॅप नावानं हे पार्लर चालवलं जात होतं. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचं पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी दाखल झालं. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांचं सहकार्य मिळालं.