अमरावती :अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना चार दिवसानंतर पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं. दहा कोटी रुपये त्वरित द्यावेत, अन्यथा अनर्थ घडेल अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी 11 ऑक्टोबरला हैदराबाद वरून पत्र पाठवणाऱ्या अमीर नावाच्या व्यक्तीनेच पुन्हा एकदा हे पत्र पाठवलं.
राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार :चार दिवसात नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा धमकीच पत्र मिळाल्यामुळं खळबळ उडाली. 11 फेब्रुवारीला पाठवलेला पत्राप्रमाणेच आज आलेल्या पत्रात मजकूर आहे. दहा कोटी रुपये मला त्वरित द्यावेत, अन्यथा अनर्थ होईल असं देखील या पत्रात अमीर नामक व्यक्तीनं म्हटलं आहे. हे पत्र पुन्हा एकदा हैदराबाद वरूनच स्पीड पोस्टद्वारे नवनीत राणा यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवण्यात आलंय. चार दिवसात सलग दुसऱ्यांदा आलेल्या धमकीच्या या पत्रासंदर्भात नवनीत राणा यांचे सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नवनीत राणांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी दिली माहिती (Source - ETV Bharat Reporter) नवनीत राणांच्या जीवाला धोका :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा मिळालेली धमकी पाहता नवनीत राणा यांच्या जीवालाधोका आहे, असं विनोद गुहे यांनी म्हटलं. पोलिसांनी माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला त्वरित अटक करावं अशी मागणी देखील विनोद गुहे यांनी केली.
याआधीच्या पत्रात काय म्हटलं होतं ? :"तुम्ही हिंदूंबाबत अधिक बोलता हे योग्य नाही. मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर.... तुमच्यासोबत काही अनर्थ देखील मी करणार. तुमच्यावर सामूहिक अत्याचार केला जाईल," अशी धमकी पहिल्या पत्राद्वारे नवनीत राणा यांना देण्यात आली. माझे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे. तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आली.
हेही वाचा
- "सर्वसामान्य माणसाचा खिसा खाली करण्यासाठी...", मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत प्रताप सरनाईकांचा आघाडीला टोला
- एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वीच सरकारनं दिलं मोठं गिफ्ट
- पोहण्याचा मोह जिवावर बेतला; तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू