बीड : संतोष देशमुख खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी 07 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आलं, मात्र विष्णू चाटे यानं न्यायालयाकडं मला लातूर कारागृहात ठेवावं, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी केली आहे. एकीकडं बीड जिल्ह्यात कृष्णा आंधळे याला अटक करा या मागणीसाठी आंदोलनं केली जात आहेत.
आरोपी विष्णू चाटे (ETV Bharat) विष्णू चाटे याला हलवलं लातूर कारागृहात :खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला गेवराई इथल्या कारागृहात ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर आता या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. खंडणी प्रकरणातील आरोप विष्णू चाटे यानं आपल्याला लातूर कारागृहात ठेवण्यात यावं, यासाठी विनंत अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याला लातूर इथल्या कारागृहात हलवण्यात आलं आहे. उर्वरित 06 आरोपी हे गेवराई इथल्या कोठडीतच ठेवण्यात आलं. यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत.
लातूर कारागृह (ETV Bharat) वाल्मिक कराडला सात दिवसाचा पीसीआर :खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक असलेला वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं मोर्चे होताना पाहायला मिळत आहेत. त्याच अनुषंगानं वाल्मिक कराड याला प्रथम केज पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर बीड इथं जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडवर प्रसार माध्यमांच्या बातम्यावरच दोषी ठरवलं आहे का, असा सवाल न्यायालयानं वकिलांना विचारला. त्यावेळेस वकील अनुत्तरीत झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडला सात दिवसाचा पीसीआर जरी दिला, तरी या प्रकरणात वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा नोंद होईल का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लातूर कारागृह (ETV Bharat) हेही वाचा :
- संतोष देशमुख हत्या प्रकरण; विष्णू चाटेला 'या' तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
- संतोष देशमुख खून प्रकरण; सातही आरोपींवर मोक्का, तर विष्णू चाटेला दोन दिवसाची सीआयडी कोठडी
- संतोष देशमुख हत्याकांड : आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्यानंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल