मुंबई Sanjay Raut Warns To Bjp :शिवसेना ( उबाठा ) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "ही निवडणूक भाजपासाठी अवघड आहे. त्याच भीतीमुळे कंस मामा सगळ्यांना तुरुंगात टाकतात. देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. भारतात रशिया आणि चीनसारखीच स्थिती आहे. लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांचं भवितव्य लोकच ठरवतील," असंही खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. "आमचं सरकार आल्यावर कोण कारागृहात जाईल, हे पाहा," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
'कंस मामाला भीती वाटल्यानं कारागृहात पाठवत आहे' :"कंस मामाला ज्यांची भीती होती, त्या सगळ्यांना त्यानं तुरुंगात टाकलं. कंस मामानं देवाला देखील तुरुंगात टाकलं होतं. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला. कंस मामाला भीती वाटत आहे, त्यामुळे विरोधकांना तुरुंगात टाकत आहेत," असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
रशिया आणि चीनसारखी भारतात स्थिती :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावनेतून खोट्या केस मध्ये अटक केली, हे सर्व जण जाणत आहेत. विश्वगुरू देखील जाणत आहेत. दिवसेंदिवस त्यांना भीती वाटत असून जंगल राज सुरू आहे. जसं रशिया आणि चीनमध्ये सुरू आहे, तसं इथं देखील सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पूर्ण बहुमतानं निवडून आले आहेत. तिथं भाजपाला 5 च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. अरविंद केजरीवाल कारागृहातून देखील काम करू शकतात. अरविंद केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणलं, ईडी सीबीआय यांनी नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा :
- निवडणूक रोखे घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक - PM Narendra Modi
- चोरांच्या सरदारांनी भाजपाच्या खात्यात ८ हजार कोटी गोळा करणं म्हणजे हप्ता वसुली- संजय राऊत - Sanjay Raut News
- पंतप्रधान मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं-संजय राऊत - Sanjay Raut news today