मुंबई Sanjay Raut Attack On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अमित शाह हे 'लालबागचा राजा'चं दर्शन घेणार आहेत. मात्र या दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं. महाराष्ट्र कमकुवत करुन इथले उद्योग गुजरातला पळवले. आता ते 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला येत आहेत. मात्र अमित शाह हे 'लालबागचा राजा'ही गुजरातला पळवतील, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
अमित शाहांनी महाराष्ट्रातील उद्योग पळवले :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. त्यांनी महाराष्ट्र कमकुवत केला. अमित साह यांचं गृहखात्याकडं लक्ष नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. महाराष्ट्रातील जनता अमित शाह यांना शत्रू मानते. आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत. मात्र अमित शाह हे 'लालबागचा राजा'ही गुजरातला पळवतील अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.
स्वतःला महाराष्ट्राचे दुश्मन समजतात :"अमित शाह हे 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या. परंतु मला सारखी भीती वाटते, ज्याप्रमाणं मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवून नेल्या, त्याप्रमाणं एक दिवस 'लालबागचा राजा'ही गुजरातला नेणार नाहीत ना?
हे काहीही करू शकतात. 'लालबागचा राजा' गुजरातला नेण्याचा प्रस्ताव सुद्धा हे काढू शकतात. हे व्यापारी लोक आहेत, म्हणून मी सावधपणे सर्व बोलत आहे. कारण हे स्वतःला महाराष्ट्राचे दुश्मन समजतात. गृहमंत्र्यांचं काम असतं सर्वांना समान न्याय द्यायचं. पक्ष फोडणं, न्यायालयावर दबाव आणणं, निवडणूक आयोगावर दबाव आणणं. हेच काम देशाचे गृहमंत्री करत आहेत. इतिहासात याची नोंद राहील."
शरद पवारांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे :"ज्या पद्धतीचे निकाल लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिले आहेत, ते बघता गृहमंत्र्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा आहे. म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करीत नाहीत. हरियाणा सोबत निवडणुका घ्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक का घेत नाहीत ? तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका लुटण्यासाठी पालिका तुमच्या लोकांच्या हाती दिली आहे, हाच तर सर्वात मोठा घोटाळा आहे.
शरद पवारांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, हे जर देवेंद्र फडणवीस यांना समजलं, तर त्यांची आजची अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही. २०१९ मध्ये सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीस यांना कळलं नव्हतं. तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. म्हणून हिम्मत असेल तर 2024 च्या विधानसभा निवडणुका वेळेत घ्या," असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
हेही वाचा :
- भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news
- "माझ्यावर बलात्कार...", स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांविरोधात ईडीला लिहिलं पत्र - Patra Chawl Scam Case
- आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest