महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरणात अटक असलेल्या आरोपींची दिल्ली पोलिसांकडून तीन तास चौकशी - Salman Khan House Firing - SALMAN KHAN HOUSE FIRING

Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपींची बुधवारी 3 तास कसून चौकशी करण्यात आली. आजही त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Salman Khan House Firing
सलमान खान गोळीबार प्रकरणात अटक असलेल्या आरोपींची दिल्ली पोलिसांकडून तीन तास चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 10:04 AM IST

मुंबई Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयितांची दिल्ली पोलिसांच्या पथकानं कसून चौकशी केली. सुमारे तीन तास चाललेल्या या चौकशीत आरोपी आणि गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्यातील संबंध उलगडण्याचा उद्देश होता.

आजही होणार चौकशी : दिल्लीत बिश्नोई टोळीवर अनेक गुन्हे दाखल असताना विकी गुप्ता आणि सागर पाल हे बिश्नोई टोळीच्या साथीदारांच्या संपर्कात कसे आले हे समजून घेण्यास दिल्ली पोलीस उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे सध्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई दिल्ली पोलिसांच्या अटकेत आहे. याव्यतिरिक्त, बिश्नोई टोळीच्या संभाव्य कटांबद्दल दिल्ली पोलिसांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झाले. त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. काही चौकशीचे मुद्दे शिल्लक राहिल्यास गुरुवारी पुढील चौकशी करण्याचे नियोजिन असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गुजरातच्या भुजमधुन आरोपांना अटक : 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर विकी गुप्ता आणि सागर पाल पळून गेले होते. परंतु त्यांना 48 तासांच्या आत गुजरातमधील भुज इथं मुंबई गुन्हे शाखेनं पकडलं. तसंच गोळीबारात वापरलेली पिस्तूल सुरतमधील तापी नदीत टाकण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांतून दोन्ही पिस्तूल नदीमधून जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी गुरुवारी संपणार आहे. अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेला आरोपींच्या कोठडीत मुदतवाढ हवी आहे. दोन्ही आरोपींना पिस्तूल देणारे आणि पैसे पुरवणाऱ्या व्यक्तींचा शोध लागला नसल्यानं पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खान गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन घेतले महत्त्वाचे निर्णय, लॉरेन्स टोळीवर होणार मोठी कारवाई - Salman Khan House Firing
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण; गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा लागला शोध - Salman Khan House Firing
  3. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan

ABOUT THE AUTHOR

...view details