महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तानाजी सावंतांवर रोहित पवारांनी केलेले आरोप खरे, लवकरच पुरावे सादर करणार - अंबादास दानवे - Ambulance Scam

Ambulance Scam : आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णवाहिकासंदर्भात हा घोटाळा झाला असून करोंडाचा घोटाळा सावंत यांनी केला आहे असा थेट (Rohit Pawar) आरोप पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही हा घोटाळा झाला असून आम्ही लोकसभा निवडणुकीत हा घोटाळा बाहेर काढू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे
अंबादास दानवे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 9:50 PM IST

अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर :Ambulance Scam : आमदार रोहित पवार यांनी बिव्हीजी कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील आरोप खरे असून त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत असा खुलासा केला आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीत आरोप सिद्ध करून दाखवू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. ब्लॅक लिस्टेड कंपनी असताना बीव्हीजी काम करत आहे. हा घोटाळा आहे. मला वाटतं तानाजी सावंत यांना न विचारता काम केलं असेल. मात्र, त्याचा भांडाफोड आम्ही करू असं देखील दानवे यांनी सांगितलं आहे.

विरोधकांचं संतुलन बिघडलेलं :ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जॉनी लिव्हर अशी टीका केली. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊत म्हणजे केश्तो मुखर्जी असल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना त्यांचे बॅलंस बिघडायचे दिवस सुरू झाले. ज्यांचे बॅलंस राहत नाही ते पराभूत होतात. केश्तो मुखर्जी, गणपत पाटील समाजाचे घटक होते. (Ambulance Scam) राऊत फक्त शब्दाने घायाळ करत आहेत. आणखी ते मैदानात उतरले नाहीत असा पलटवार (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी केला आहे. तर मला भवितव्य आहे, संघटना सोडणार अशा अफवा पसरवत आहेत. माझ्या विषयी सूत्रांच्या हवाल्याने काहीही बातम्या लावल्या तर मी नोटीस देईल असा इशाराही दानवे यांनी काही प्रसिध्दी माध्यमांना दिला आहे.

खैरे-दानवे यांनी घेतली आढावा बैठक : महाविकास आघाडी म्हणून, पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहोत. प्रत्येकाची निवडणूक लढवण्याची पद्धत असते. शिवसेनेची देखील आपली पद्धत आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांशी महत्वाची बैठक अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीला चंद्रकांत खैरे देखील उपस्थितीत होते. खैरे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचं काम मी करत आहे. जुने विषय संपले आहेत. उमेदवार देताना महायुतीकडे उमेदवार नाही. कोणी जात पाहत आहे तर कोणी अजून काही पाहत आहे. तसंच, जात-पैसे शिवसेनेनं असं कधी पाहिलेलं नाही असं म्हणत दानवे यांनी विरोधकांवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details