छत्रपती संभाजीनगर Mohan Bhagwat On Ram Mandir : "राम मंदिरासाठी निधी जमा होईल का? याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, ते होणार हे लोकांना माहीत होत, त्यामुळे ते मदत करण्यासाठी तयार होते. मंदिर होणार हे कळताच त्यांनी मदत दिली आणि खूप कमी वेळेत भव्य राम मंदिर उभारलं गेलं. राम मदिर उभारणीला तब्बल 500 वर्षाचा संघर्ष आहे," असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. "आधीच्या लोकांनी केलेल्या कामांमुळे आपल्याला आजचा दिवस दिसतोय. कुठलंही काम करताना पूर्ण समर्पण गरजेचं असते," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. स्वर्गीय दत्ताजी भाले स्मृती समितीतर्फे उभारलेल्या समर्पण या इमारतीच्या लाकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
राम मंदिराला 500 वर्षांचा संघर्ष :"अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आणि खूप त्याग केल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचं स्वप्न साकार झालं. 500 वर्षांचा संघर्ष होता, मात्र मागील तीस वर्षांच्या राम मंदिर आंदोलनामुळे लोकांचा विश्वास वाढला. राम मंदिरासाठी निधी जमा होईल का? याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, ते होणार हे लोकांना माहीत होत, त्यामुळे ते मदत करण्यासाठी तयार होते. मंदिर होणार हे कळताच त्यांनी भरभरून आर्थिक मदत दिली आणि खूप कमी वेळेत भव्य राम मंदिर उभारले गेलं," असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगरातील दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. "राम मंदिरांसाठी मागील पिढीतील अनेकांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आपल्याला आजचा दिवस दिसतोय," असंही त्यांनी सांगितलं.