महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला, राज्यातील मतदानातील अनियमिततेचे आरोप फेटाळले - DEVENDRA FADNAVIS

राहुल गांधी यांनी त्यांच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. त्यांनी राज्यातील मतदानातील अनियमिततेचे राहुल गांधी यांचे आरोप फेटाळलेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2025, 3:23 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कथित विसंगतींचा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, दिल्ली निवडणुकीच्या निकालांमध्ये आपल्या पक्षाच्या पराभवाची जाणीव असलेले विरोधी पक्षनेते अशा काही गोष्टी सांगून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आज दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे तसंच संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आरोप केला होता की, पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या मतदार यादीत ३९ लाखांहून अधिक मतदारांची नावे जोडण्यात आली आहेत. फडणवीस यांनी लोकसभा विरोधी पक्षनेत्यांचे आरोप फेटाळून लावत म्हटलं की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विचलीत करण्यासाठी ते आतापासूनच अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

राहुल गांधींनी खोटे बोलून स्वतःला सांत्वन देण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं. आत्मचिंतन न करता काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन अशक्य आहे, असं ते म्हणाले." निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा पक्ष दिल्लीत कुठेही राहणार नाही हे माहीत असल्यानं राहुल गांधी ते संभाव्य अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच, दिल्लीच्या निकालादिवशी काय बोलायचं याचं ते आत्तापासूनच प्रॅक्टिस करत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधींवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट केलं, "जेव्हा एकच विनोद वारंवार सांगितला जातो तेव्हा तुम्ही त्यावर हसत नाही! #RahulGandhi."

राहुल गांधींनी नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर हे घडले आहे, विशेषतः २०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत ३९ लाख नवीन मतदारांची भर पडली हे अधोरेखित झालं. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना (यूबीटी) चे संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपीच्या सुप्रिया सुळे यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी मतदार नोंदणीच्या आकडेवारीतील तफावतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि दावा केला की नोंदणीकृत मतदारांची संख्या महाराष्ट्राच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा..

  1. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
  2. ...तर भाजपाच्या खासदाराचा पराभव झाला असता, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

ABOUT THE AUTHOR

...view details