महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi News: राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात  पोहोचणार; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

Rahul Gandhi News : कॉंग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात येणार आहे. यानिमित्तानं कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसमधील गटबाजीदेखील लपून राहिलेली नाही.

Rahul Gandhi: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी
Rahul Gandhi: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 7:46 AM IST

Updated : Mar 15, 2024, 11:37 AM IST

कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

ठाणे Rahul Gandhi News : ठाण्यात शनिवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. भिवंडीवरुन ठाण्यात आल्यानंतर ठाण्यात मुंब्रा, कळवामार्गे ही यात्रा चिंतामणी चौक इथं सभा झाल्यानंतर मुलुंडमार्गे पुढं जाणार आहे. त्यामुळं या सर्व मार्गावर कशा प्रकारे नियोजन करायचं यासाठी बैठका सुरू आहेत. यासाठी ठाण्यातील सर्व जेष्ठ नेते तयारीला लागले आहेत.

पक्षाचे नेते कामाला : ठाण्यात येणाऱ्या भारत जोडो न्याययात्रेसाठी जसे काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. तसंच महाविकास आघाडी देखील कामाला लागलीय. या यात्रे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातून ही भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे. त्यामुळं काही काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केलीय. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा 2000 सालानंतर शिवसेनेकडे गेलाय. तीन वेळा महापौर पद मिळवणारा काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यानंतर ठाण्यावरील काँग्रेसची पकड ढिली झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेनंतर आता ठाण्यातील काँग्रेसचे दिवस चांगले येतील, अशा विश्वास असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय.

काँग्रेसचे दोन गट आले समोर : सुरुवातीपासूनच ठाण्यातील काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण असल्याचं समोर आलंय. या राजकारणामुळं पक्षाचं मोठं नुकसान होऊन सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक कमी झाले. याचा परिणाम म्हणून ठाणे महापालिकेत काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक आहे. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विक्रांत चव्हाण हे या यात्रेसाठी वेगळी तयारी करत आहेत. काँग्रेसचे इतर नेते दुसरीकडे वेगळी तयारी करताना दिसत आहे. यावरुन ही काँग्रेसमधील गटातटाकडून भारत जोडो यात्रेची तयारी असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला फोडण्यासाठी प्रयत्न : ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठाण्यात आता राहुल गांधी यांची येणारी भारत जोडो न्याय यात्रा ही महायुतीला आव्हानात्मक ठरावी. यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi : मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा एक रुपयाही नाही; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
  2. Rahul Gandhi : राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन, महिलांसाठी केली मोठी घोषणा
Last Updated : Mar 15, 2024, 11:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details