पुणे Teacher Beaten Student Pune : पुणे शहराला विद्येच माहेरघर म्हटले जाते. याच पुण्यात जगभरातील अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी पुण्यात येत असतात. असे असताना पुण्यातील पेठेत असलेल्या एका शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
पोलिसात तक्रार दाखल :पीडित मुलाच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत संबंधित शिक्षेकवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी तक्रारीत म्हटले, " 7 मार्चला माझा मुलगा शाळेत गेला असताना त्याच्या गणित या विषयाच्या शिक्षिका या रजेवर होत्या. त्यांच्या जागेवर दुसऱ्या शिक्षिका ऑफ तास असताना बदली शिक्षिका म्हणून आल्या. त्यावेळेस वर्गातील सर्व मुले ही एकमेकांशी घोळका करुन बोलत होते. त्याच वेळेस या शिक्षिका या वर्गावर आल्या. त्यावेळेस सर्व विद्यार्थी हे पांगले. या शिक्षिकेनं कसलीही विचारपूस न करता माझ्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाचे दोन्ही हात पिरगळले. कचऱ्याच्या डब्यात त्याचं तोंड घालून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला सदरचा प्रकार झाल्यानंतर 'कोणाला सांगायचे त्याला सांग' अशी धमकी दिली.
मुलाच्या वडिलांनी काय सांगितलं?पीडित मुलाचे वडील म्हणाले, " माझ्या मुलानं मारहाण झाल्याचं सांगितलं नाही. कारण त्याची वार्षिक परिक्षा जवळ आली होती. मला नापास करतील, या भीतीनं माझ्या मुलानं मारहाणीचा प्रकार सांगितला नाही. परंतु माझ्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडीओ हा व्हायरल झाला. तो माझ्या पाहण्यात आल्यानं मला सदरचा प्रकार समजला. त्यानंतर मुलाला विचारणा केली असता त्यानं सविस्तर प्रकार मला सांगितला. त्यानंतर मी ८ मार्चला विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला आहे. हा सगळा प्रकार एक महिन्यापूर्वी घडलेला आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेनं मारहाणीचा व्हिडिओ दाखविला होता."
मुलाच्या आईनं काय सांगितलं?"शेजारच्या महिलेनं व्हिडिओबाबत सांगितले. मुलाला कचऱ्यात तोंड घालून मारहाण केली. मुलांनी चोरून व्हिडिओ काढला. त्या शिक्षेकवर कारवाई करावी. माझी काही चुकी नाही. मी एकटाच सापडलो, असे मुलानं सांगितले. दहावीच्या मुलांनाही अशीच मारहाण झाली होती. मोबाईल नेण्यास शाळेत परवानगी नाही. व्हिडिओ काढणाऱ्या मुलाचे स्वागत व्हायला पाहिजे," असे मुलाच्या आईनं सांगितलं.
- मुलाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार गंभीर असून त्याबाबत संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच यापूर्वीदेखील या शिक्षिकेनं बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली असल्याचं देखील समोर आल्याचं पालकांना समजलं आहे.
हेही वाचा-
- वाहन चोरीच्या संशयावरुन 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत खून; आरोपीला पोलिसांकडून अटक - Mumbai Crime News
- सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलाला मारहाण : चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Student Beaten In Pune University