पुणे Pune Car Accident Case Updates : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना सोमवारी (27 मे) पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी वैद्यकीय विभागानं नेमलेली त्रीसदस्यीय समिती घटनेच्या चौकशीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली आहे.
डॉ. पल्लवी सापळे आणि रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया (Source reporter)
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ चौधरी यांची त्रीसदस्यीय समिती नेमण्यात आली असून ही समिती संपूर्ण घटनेची चौकशी करुन याचा अहवाल शासनाकडं पाठवणार आहे.
डॉ. पल्लवी सापळे काय म्हणाल्या? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ.पल्लवी सापळे म्हणाल्या की, कल्याणीनगर येथे घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करुन ती माहिती आम्ही शासनाला कळवणार आहोत. शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले असून त्या प्रक्रियेद्वारेच आम्ही माहिती घेणार आहोत. या अपघाताच्या बाबतीत जी काही प्रक्रिया झाली, ती योग्य झाली की नाही, त्याबाबत आम्ही चौकशी करू, असंही त्या म्हणाल्या.
रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया :यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या समितीची भेट घेत निपक्षपणे या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसंच अटक असलेले डॉ. अजय तावरे यांच्यावर याआधी देखील अनेक आरोप असून आता देखील त्यांनी फोनवर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केलाय. या चौकशी समितीनं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये, असंही धंगेकर म्हणाले.
हेही वाचा -
- पुणे अपघात प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले... - Pune Hit And Run Case
- पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case
- पुणे हिट अँड रन प्रकरणी 'त्या' अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा - Essay Competition On Pune Accident