महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 1:38 PM IST

ETV Bharat / state

"ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या प्रकरणावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Pune Drugs News
Pune Drugs News (ETV Bharat)

पुणे Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये काही तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुचनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसेच ⁠सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील या ड्रग्ज प्रकरणाबाबत आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहे. पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणाला मंत्री शंभूराजे देसाई हेच जबाबदार आहेत. त्यांच्या विरोधात येत्या काळात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुण्याती ड्रग्ज प्रकरणावर आमदार रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप (Source- ETV Bharat Reporter)

रस्त्यावर उतरुन आंदोलन करू :यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ''आज पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अनेक हॉटेल्समध्ये सर्रास ड्रग्जची विक्री होत आहे. हे पब कायमस्वरूपी बंद केले पाहिजेत. शहरातील आता पब चालकांना पोलिसांची आणि प्रशासनाची भीती राहिलेली नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार चालू चालतात. ही कीड संपलेली नाही. पैसे आणि हप्ता यांच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचं काम काही लोकांकडून होत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरुन या विरोधात आंदोलन करणार आहोत. शिवाय पावसाळी अधिवेशनात आवाजही उठवणार आहोत, असं यावेळी ते म्हणाले.''

ड्रग्ज प्रकरणाला मंत्री शंभूराजे देसाई जबाबदार : " पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आत्ता पोलिसांनी कारवाई केलेली कारवाई योग्य आहे. पण याचा मास्टर माईंड कोण आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या ड्रग्जमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण असल्यानं पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत. या ड्रग्ज प्रकरणाला मंत्री शंभूराजे देसाई हे जबाबदार आहेत," असा आरोप यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केला.

पोलिसांवर गंभीर आरोप : ते पुढे म्हणाले की, ''या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. शहरात अंमली पदार्थ सर्रासपणे मिळत आहे. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यामध्ये पोलिसांचीच चुकच आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक देवघेवीमुळं असे धंदे चालतात. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हे अधिकाऱ्याला पाठिशी घालतात. त्यामुळे हे धंदे चालत आहेत, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

हेही वाचा

  1. मंत्री दिलीप वळसे-पाटीलांवर अवमानाचा खटला चालणार, 6 आठवड्यांत जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Dilip Walse Patil
  2. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एसआयटी चौकशी होणार - NEET Paper Leak Case
  3. "आहो मास्तर, पोरगं नापास झालं..आता काय करायचं!" उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री, पाहा व्हिडिओ - Udayanraje Bhosale Mimicry

ABOUT THE AUTHOR

...view details