पुणे :केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्यानं गुंड गजा मारणे याला चांगलेच भोवणार असल्याचं चित्र दिसत आहे.शिवजयंतीच्या दिवशीकेंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गुंड गजा मारणेच्या टोळीतील काही लोकांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाण करणाऱ्यांपैकी तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यानंतर गुंड गजा उर्फ गजानन मारणे यालादेखील पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
तिघांना अटक :19 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाली होती. हा तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. जोग याला मारहाण झाल्यावर मंत्री मोहोळ यांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर या मारहाण प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) इतर आरोपींचा शोध सुरू : यासंदर्भात अधिक माहिती देत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, "पुण्यातील कोथरूड येथे झालेल्या मारहाण प्रकरणी गजा मारणे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलं होतं. तर इतर आरोपी फरार असून त्यांचादेखील शोध सुरू आहे." तसंच गजा मारणेला 25 फेब्रुवारीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही यावेळी कदम म्हणाले.
गजा मारणे चे वकील विजयसिंह मोहिते यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) गजा मारणेचे वकील काय म्हणाले? :"गजा मारणे स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. खरं तर जेव्हा घटना घडली तेव्हा गजा मारणे तिथं उपस्थित नव्हता. मात्र, पोलिसांनी आता त्याचं नाव घेतलंय. त्यामुळं तपासासाठी गजा मारणे स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. याप्रकरणात ज्या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे," असं गजा मारणे याचे वकील विजयसिंह मोहिते यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. त्यानंतर सोमवारी (24 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास स्वतः गजानन मारणे कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही वाचा -
- गुन्हेगारांनी रिल्स टाकू नये! पुणे पोलिसांनी गजा मारणे, नीलेश घायवळसह गुंडांची काढली परेड
- शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅन्डींग सुविधा ; उडाण योजनेत करणार समावेश, मुरलीधर मोहळ
- मुरलीधर मोहोळांनी गाठलं 'शिवतीर्थ'; पुण्यासाठी ठरवला प्लॅन? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण