पुणेPrachi Deb Honored :युनायटेड किंग्डम (युके) येथे नुकतेच भारतीय संस्कृती आणि भारतीयांचे योगदान साजरे करण्यानिमित्त 'इंडिया वीक'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीयांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी यूके संसदेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये सीबीई नवीन शाह यांनी प्राची दब यांचा सत्कार केला आहे. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मान होणाऱ्या प्राची या पहिल्या केक कलाकार आहे.
पुण्यातील केक आर्टिस्ट प्राची धबल देब यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मान - Prachi Deb Honored
Prachi Deb Honored : पुण्यातील केक आर्टिस्ट प्राची धबल देब यांनी रॉयल आयसिंग या अनोख्या कलेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना युनायटेड किंग्डम (युके) येथील ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मानित करण्यात आलं आहे. जाणून घ्या त्यांच्या कार्याबद्दल...
Published : Jul 19, 2024, 10:53 PM IST
सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त :लंडनमध्ये शिकल्यानंतर जवळपास एक दशकाहून अधिक काळ रॉयल आइसिंग या कलेला प्रोत्साहन देणाऱ्या प्राची यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मला ज्या क्षेत्रात खूप आवड आहे, अशा क्षेत्रात माझ्या कामाची दखल घेणं हा सन्मान आहे. हा प्रवास आव्हानात्मक होता; पण खूप शिकवणारा पण होता, असं यावेळी प्राची देब म्हणाल्या.
शाकाहारी जीवन पद्धतीला प्रोत्साहन देण्याचं काम :प्राची देब यांनी केक बनविण्यासाठी आणलेल्या कलात्मकतेच्या बाबत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. तसेच तीन जागतिक विक्रमांची नोंद देखील झाली आहे. यात मिलान कॅथेड्रलपासून प्रेरित 100 किलोग्रॅम केकची रचना, सर्वाधिक शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्सची रचना आणि भारतीय राजवाड्याची शाकाहारी रॉयल आयसिंगद्वारे तयार केलेली 200 किलो वजनाची खाद्ययुक्त रचना यांचा समावेश आहे. उत्तम पद्धतीचे केक बनविण्यात हातखंडा असलेल्या प्राची यांनी अनेक विक्रम केले आहेत. व्हेगन रॉयल आयसिंगच्या माध्यमातून देखील त्यांनी व्हेगन लाईफस्टाईल अर्थात संपूर्ण शाकाहारी जीवन पद्धतीला प्रोत्साहन देण्याचं देखील काम केलं आहे.